उपराष्ट्रपती कार्यालय

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींचा देशाला उद्देशून शुभेच्छा संदेश

Posted On: 25 JAN 2021 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021

 

उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना विनम्र अभिवादन करत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा संपूर्ण शुभेच्छा संदेश याप्रमाणे आहे :-

प्रजासत्ताक दिनाच्या मंगल प्रसंगी मी आपल्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो.

ह्या प्रसंगी आपण आपल्या घटनेच्या प्रती आणि आपल्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या जतन केलेल्या आदर्शांवर आधारित लोकशाहीच्या मूलभूत तत्वांप्रती आपली कटिबद्धता पुन्हा घट्ट रुजविली पाहिजे. आपली घटनात्मक मूल्ये ही आपल्या लोकशाहीची मुळे खोलवर रुजविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रबुद्ध नागरिकत्वाच्या निर्मितीसाठीची मूळ तत्वे आहेत.

आज, आपला भारत, सर्व क्षमतेने संपूर्ण सक्षम असलेला देश बनला असून तो सर्वसमावेशी आणि शाश्वत अशा सर्वांगीण विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करीत पुढे जात आहे. आपली लोकशाही सळसळत्या उत्साहाने भरलेली आहे आणि आधीपेक्षा अधिक उत्तम राज्यकारभार आणि पारदर्शकता असलेली आहे. या मंगल दिवशी, देशाच्या संस्कृतीचे आदर्श आणि लोकशाही मूल्यांना अधिक उज्ज्वल करण्याची शपथ पुन्हा एकदा घेऊया आणि सर्वसमावेशक, शांततापूर्ण, सुसंवादी आणि प्रगतीशील भारताची उभारणी करूया.

या आनंदमयी दिवशी, आपल्या प्रजासत्ताकाने मिळविलेले यश साजरे करुया आणि अधिक गंभीरतेने, अधिक आत्मविश्वासाने भरलेल्या आणि अधिक आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निश्चय करूया. हा नवा भारत देश आपल्या लाखो वर्ष जुन्या परंपरांच्या माध्यमातून जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात योगदान देत राहील आणि समावेशी, शाश्वत विकास घडवेल.

उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा हिंदी अनुवाद खालील प्रमाणे

मैं गणतंत्र दिवस समारोह के इस आनंदपूर्ण अवसर पर अपने देश के समस्त नागरिकों को हार्दिक बधाई और शुभकामनाएँ देता हूँ।

इस अवसर पर हमें संविधान तथा स्वतंत्रता, समानता, बंधुत्व और सभी के लिए न्याय के पोषित आदर्शों पर आधारित हमारे गणतंत्र के आधारभूत सिद्धांतों के प्रति अपनी प्रतिबद्धता को दोहराना चाहिए। हमारे संवैधानिक मूल्य प्रबुद्ध नागरिकों के सृजन हेतु वे मूलभूत सिद्धान्त हैं जो हमारी लोकतांत्रिक जड़ों को और मजबूत बनाने के लिए अनिवार्य हैं।

आज, भारत एक ऐसा देश है जो संभावनाओं से परिपूर्ण है और यह सर्वांगीण विकास के ऐसे मार्ग पर अग्रसर हो रहा है जो सकल समावेशी और संपोषणीय है। हमारा लोकतंत्र जोशपूर्ण है और सुशासन और पारदर्शिता के प्रति हमारी प्रतिबद्धता पहले से कहीं अधिक सुदृढ़ है। इस शुभ दिवस पर, आइए हम देश के  सभ्यतागत आदर्शों और संवैधानिक मूल्यों को कायम रखने के अपने संकल्प को दोहराएँ और एक सकल समावेशी, शांतिपूर्ण, समरसतापूर्ण और प्रगतिगामी भारत का निर्माण करने के प्रति स्वयं को समर्पित करें।

आइए, इस आनंदपूर्ण दिवस पर हम अपने गणतंत्र की उपलब्धियों का गुणगान करें और एक पहले से अधिक आत्म-विश्वासी और आत्मनिर्भर भारत के निर्माण के प्रति स्वयं को समर्पित करने का निष्ठापूर्वक संकल्प लें जो विश्व शांति और समावेशी संपोषणीय विकास में योगदान देने की अपनी प्राचीन परंपरा को जारी रखे हुए है।

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1692255) Visitor Counter : 101