सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाचा “भारतीय सांकेतिक भाषा” यावरील चित्ररथ हे या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

Posted On: 25 JAN 2021 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाअंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचा चित्ररथ भारतीय सांकेतिक भाषा -एक राष्ट्र एक सांकेतिक भाषा ही संकल्पना साकारणार आहे. बोली भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात वैविध्य असलेल्या देशातील भारतीय सांकेतिक भाषेच्या (आयएसएल) एकरुपतेचे स्वरूप हा चित्ररथ अधोरेखित करेल. भारतीय सांकेतिक भाषेचा प्रसार करून कर्णबधिरांना अडथळामुक्त वातावरण तयार करण्याबाबत सरकारच्या बांधिलकीवर प्रकाश टाकणे आणि जनजागृती करणे हा या चित्ररथाचा उद्देश आहे. सांकेतिक भाषा ही एक दृश्य भाषा आहे ज्यात कर्णबधिरांना संवादाचे साधन म्हणून हात, चेहऱ्यावरील हावभाव आणि शरीराच्या हालचालींचा वापर केला जातो. ही एकमेवाद्वितीय आणि एकसंध भाषा आहे जी देशातील सर्व कर्णबधिरांना परस्परांशी जोडते.

भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे भारतीय सांकेतिक भाषा (आयएसएल), दुभाषी आणि शिक्षक तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आयोजित करते आणि विविध कार्यक्रम तसेच समारंभात संस्थांना दुभाषी सेवा प्रदान करते. या केंद्राने एक शब्दकोश विकसित केला असून त्यात दररोजच्या वापराव्यतिरिक्त 6000 शैक्षणिक, वैद्यकीय, कायदेशीर आणि कृषी संबंधी शब्द आहेत.

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1692243) Visitor Counter : 128


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil