मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
देशातील एव्हीयन इन्फ्लुएंझाची (बर्ड फ्लू) सद्यस्थिती
प्रविष्टि तिथि:
24 JAN 2021 8:54PM by PIB Mumbai
24 जानेवारी 2021 पर्यंत, 9 राज्यातील (केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब) कुक्कुट पक्षांमध्ये आणि 12 राज्यातील (मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि पंजाब) कावळे/ स्थलांतरित/ जंगली पक्षांमध्ये एव्हीयन इन्फ्लुएंझाची (बर्ड फ्लू) लागण झाल्याचे निश्चित झाले आहे.
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सावरगड आणि उजोना दारवाह या कुक्कुटपालन केंद्रातील नमुन्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझाची पुष्टी झाली आहे. तसेच नवी दिल्लीच्या जामिया हमदर्द विद्यापीठातील कावळ्यांच्या नमुन्यात एव्हीयन इन्फ्लूएंझाची पुष्टी झाली आहे.
केरळमधील 1, मध्य प्रदेशमधील 3 आणि महाराष्ट्रातील 5 प्रभावित ठिकाणी कारवाई पश्चात देखरेख नियोजन जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र व इतर राज्यातील उर्वरित प्रभावित ठिकाणी नियंत्रण व प्रतिबंधित कारवाई (साफसफाई आणि निर्जंतुकीकरण) चालू आहे.
कृती योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांचे कुक्कुट पक्षी, अंडी आणि कुक्कुटपालन पशुखाद्य यांची राज्यामार्फत विल्हेवाट लावली जाईल त्या शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.
सुधारित कृती योजनेवर आधारित राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी अवलंबिलेल्या नियंत्रण उपायांबाबत सर्व राज्ये दररोज विभागाला अहवाल देत आहेत.
ट्विटर, फेसबुक या समाज माध्यमांद्वारे एव्हीयनविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विभाग निरंतर प्रयत्न करीत आहे.
***
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1692005)
आगंतुक पटल : 149