माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ती 70 वर्षे कुमारी म्हणून का जगली आणि कुमारी म्हणूनच का मरण पावली: द फर्स्ट डेथ ऑफ जोआना

पणजी, 23 जानेवारी 2021

 

ज्या महिलेने आयुष्यात  कोणाशीही प्रेमसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि 70 व्या वर्षीच कुमारी म्हणून मरण पावली अशा महिलेच्या गूढ आयुष्याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. यातूनच पोर्तुगीज दिग्दर्शक क्रिस्टियान ऑलिव्हिरा याना 'द फर्स्ट डेथ ऑफ जोना ' / ए प्राइमिरिया मॉर्टे डी जोआना  बनवण्यास प्रेरित केले, ज्याचा  गोवा येथे सुरु असलेल्या  51 व्या भारतीय  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल वर्ल्ड प्रीमियर झाला. 23 जानेवारी 2021 रोजी झालेल्या  पत्रकार परिषदेत ओलिव्हिरा म्हणाल्या: “माझा चित्रपट एका स्त्री कलाकाराच्या खर्‍या कथेवर आधारित आहे जिने  स्वत: च्या अटीवर आपले जीवन व्यतीत केले आणि कोणाबरोबरही प्रेमसंबंध न ठेवता तिचा  मृत्यू झाला. ती माझ्या अगदी जवळची होती तरीही तिचे आयुष्य माझ्यासाठी कायम गूढ राहिले. म्हणूनच मी तिच्या भूतकाळाचा आणखी शोध घ्यायला सुरवात केली. आणि अशा प्रकारे, सिनेमाचा जन्म झाला. ”

हा चित्रपट बनवताना, तिने आणि सह-लेखिका सिल्व्हिया लोरेन्को यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव या महिलेच्या वास्तविक जीवनातील अनुभवांबरोबर जोडले आहेत ज्याने त्यांना प्रेरणा दिली अशी ऑलिव्हिरा यांनी माहिती दिली .

महोत्सवाच्या जागतिक पॅनोरामा विभागात हा चित्रपट सादर करण्यात आला आहे. चित्रपटातील घटनांचा काळ 2007 असला तरी त्याचे चित्रीकरण  2021 मध्ये  दक्षिण ब्राझीलमधील नयनरम्य ठिकाणी केले गेले.

तिने ही जागा का निवडली याचे कारण कथानक त्या ठिकाणाशी घनिष्ठपणे जोडलेले आहे. “पवन ऊर्जा प्रकल्प बसवल्यामुळे त्या जागेचे एक प्रकारचे आधुनिकीकरण झाले. त्यास एक नवीन रूप मिळले. मग मला जाणवलं की ती जागा आपल्या चित्रपटासाठी योग्य आहे, कारण यात एका स्त्रीने स्वतःला बदलवण्याच्या  केलेल्या उत्कंठाकारक प्रवासाची हि कहाणी आहे. "

या चित्रपटात कॅरोलिनाची भूमिका साकारणाऱ्या इसाबेला ब्रेसेन हिने तिला या भूमिकेसाठी मिळालेल्या संधीबद्दल आपली प्रतिक्रिया  देताना सांगितले की  “, या भूमिकेसाठी मला निवडणे हे माझ्यासाठी  जादूमय होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बर्लिन महोत्सव  2017  मध्ये प्रीमिअर झालेल्या आणि ब्राझील-उरुग्वेची  सह-निर्मिती- असलेल्या 'नालु ऑन द बॉर्डर (मुल्हेर दो पै) ' या चित्रपटाद्वारे ऑलिव्हिराने   पदार्पण केले आणि 21 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात 18 पुरस्कार जिंकले.

 

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691746) Visitor Counter : 226


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi