सांस्कृतिक मंत्रालय

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकाता इथे आयोजित कार्क्रमाला पंतप्रधान उपस्थित


नेताजी हे भारताची शक्ती आणि प्रेरणा यांचे मूर्त रूप

Posted On: 23 JAN 2021 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कोलकाता येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीला उपस्थित राहिले. कोलकाता येथील विक्टोरिया मेमोरियल  येथील पराक्रम दिवस समारंभाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.  नेताजींवरील कायमस्वरूपी प्रदर्शन व  प्रोजेक्शन मॅपिंगचे उद्घाटन यावेळी झाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते संस्मरण नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण   झाले. "अमरा नूतन  जोबोनेरी दूत '' हा नेताजीं च्या जीवन आणि कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर झाला. “Re-visiting the legacy of Netaji Subhas in the 21st century”

 

या कार्यक्रमाच्या आधी पंतप्रधानांनी नेताजी सुभाष बोस यांच्या एल्गीन मार्ग येथील घर म्हणजे नेताजी भवनला भेट देऊन नेताजींना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी नॅशनल लायब्ररी कोलकाता येथे भेट दिली. याठिकाणी  "  एकविसाव्या शतकात नेताजी सुभाष  यांच्या वैचारिक वारशाशी   पुनर्भेट'  यावरील आंतरराष्ट्रीय परिषद तसेच कलाकार मेळावा आयोजित केला होता. पंतप्रधानांनी यावेळी विक्टोरिया मेमोरियल येथे पराक्रम दिवसाच्या  सोहळ्याला उपस्थिती लावण्याअगोदर कलाकार तसेच परिषदेतील सहभागीशी संवाद साधला.

 

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की मा भारतीचा शूर सुपुत्र, ज्याने स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला नवी दिशा दिली त्याचा आज जन्मदिवस आहे. आजचा दिवस आपण अशा जाणिवेचा दिवस म्हणून साजरा करतो ज्या जाणिवेने गुलामगिरीचा अंधकार दूर करून  'मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही तर ते हिसकावून घेईल', असे आव्हान   जागतिक पातळीवरच्या सर्वात बलशाली शक्तींना  दिले.

 

 नेताजींची अदम्य आत्मशक्ती आणि  देशाप्रती निस्वार्थ सेवा यांचे स्मरण गौरव करण्यासाठी 23 जानेवारी हा नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय  देशाने  घेतल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भारताची शक्ती आणि प्रेरणा यांचे नेताजी हे मूर्तरूप असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले.

अंदमान येथे एका बेटाला नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नाव देण्याचा   निर्णय 2018 मध्ये सरकारला घेता आला हे आपले सौभाग्य असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाच्या भावना लक्षात घेऊन  नेताजींशी संबंधित फाईल खुल्या करण्याचाही निर्णय सरकारतर्फे  घेण्यात आला होता असे त्यांनी सांगितले. INA अर्थात आझाद  हिंद सेनेमधील पराक्रमींचा 26 जानेवारीच्या संचलनातील सहभाग व आझाद हिंद सेनेच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिन सोहळ्यात दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचे नेताजींच्या पूर्ण झालेल्या स्वप्नाबद्दलही ते यावेळी बोलले.

आपल्या धाडसी सुटकेची योजना प्रत्यक्षात आणताना नेताजींनी आपला पुतण्या शिशिर बोस यांना विचारलेल्या प्रश्नाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, जर आज प्रत्येक भारतीयांनी स्वतःचा हात आपल्या हृदयावर ठेवून नेताजींच्या अस्तित्वाचा अनुभव घेतला तर त्यांचा तोच प्रश्न ऐकू येईल तुम्ही माझ्यासाठी काही करू शकाल का?भारताला स्वावलंबी बनवण्याचे लक्ष्य घेऊन  केलेले हे काम, हे उद्दिष्ट, हे ध्येय भारताला स्वावलंबी बनवणार आहे देशातील नागरिक देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक माणूस हा याचा भाग आहे.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी दारिद्र्य, अशिक्षितपणा , रोगराई यांना देशातील मोठ्या समस्या मानल्या होत्या असे पंतप्रधानांनी यावेळी लक्षात आणून दिले. दारिद्र्य ,  अशिक्षितपणा, रोगराई आणि वैज्ञानिक दृष्टीचा अभाव हे आपल्या समोरचे सर्वात मोठे प्रश्न असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. या समस्या सोडवण्यासाठी समाजाला एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे आणि आपण एकत्रितपणे प्रयत्न करू असे पंतप्रधान म्हणाले.

आत्मनिर्भर भारत या स्वप्नांसह शोनार बांगलाचेही नेताजी हे मोठे प्रेरणास्थान होते असे पंतप्रधानांनी सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजींनी निभावलेली भूमिका आता आत्मनिर्भर भारताच्या बाबतीत पश्चिम बंगालने निभावली पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले आत्मनिर्भर बंगाल हा आत्मनिर्भर भारताचे नेतृत्व करेल असेही यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691722) Visitor Counter : 185