विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

महाराष्ट्रातील शहरांच्या पाणीपुरवठा आव्हानांवर मात करण्यासाठी कमी खर्चाचा अभिनव उपक्रम सहाय्यक ठरला


हा उपक्रम महाग पायाभूत घटकांची आवश्यकता कमी करेल आणि प्रणालीतील कार्यान्वयन सुधारेल

Posted On: 23 JAN 2021 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021


पाणीपुरावठातल्या अडचणी, पाण्याची कमतरता, पाण्यासाठीच्या ढासळत्या पायाभूत सुविधा यांसारख्या आव्हानांवर वाजवी खर्चात मात करत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील सुमारे 20,000 लोकसंख्येची ची दोन गावे आदर्श ठरली आहेत.

Description: C:\Users\Neelima\Downloads\3 (1).jpeg Description: C:\Users\Neelima\Downloads\4 (1).jpeg

भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटी मुंबईने  जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचे जाळे अधिक कार्यक्षम  करण्यासाठी "शाफ्ट विथ मल्टिपल आऊटलेट्स" हा उपक्रम आणला आहे. या उपक्रमात सुचिबद्ध आणि विकेंद्रीकृत पायाभूत सुविधांच्या माध्यमातून अनुकूल पाणीपुरवठा संचालनाची नवीन रणनीती आखली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), जल तंत्रज्ञान उपक्रम, भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटी मुंबई आणि आयआयटी मद्रास यांच्या सहकार्याने, स्थानिक ग्रामपंचायतींच्या सहभागातून महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील सफाळे आणि उमरपाडा यागावांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. सध्या इथे बहुग्राम पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा होत आहे.

हा उपक्रम, महागड्या पायाभूत सुविधा घटकांची आवश्यकता कमी करेल आणि व्यवस्थेच्या संचालनात सुधारणा करेल.

Description: C:\Users\Neelima\Downloads\WhatsApp Image 2021-01-19 at 13.42.05.jpeg Description: C:\Users\Neelima\Downloads\WhatsApp Image 2021-01-19 at 13.42.01.jpeg

साधारणता 2000 लोकसंख्येसाठी पारंपरिक स्वरूपात, ईएसआर (अर्धा दिवस साठवणूक क्षमता) यासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च आवश्यक असतो. मात्र "शाफ्ट विथ मल्टिपल आऊटलेट्स" या उपक्रमाअंतर्गत केवळ 2 लाख रुपये खर्च येतो. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 2 हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 5 लाख वस्त्या आहेत. त्यामुळे "शाफ्ट विथ मल्टिपल आऊटलेट्स" हा उपक्रम राबवला तर सरकारच्या जलजीवन अभियान आणि अन्य शहरी पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये हजारो कोटी रुपयांची बचत होऊ शकते. खर्चाव्यतिरिक्त, या शाफ्ट उपक्रमात बहुस्तरीय तरतुदी, संचालनात सुलभता, अधिक चांगलं दाब व्यवस्थापन आणि भविष्यातील वाढत्या लोकसंख्येसाठी चांगली व्यवस्था प्रदान करतात.

या कमी खर्चाच्या उपक्रमाने, खर्चिक पायाभूत सुविधा घटकांची आवश्यकता कमी केली आणि व्यवस्थेतील संचालनात सुधारणा केली आहे.

जलशक्ती मंत्रालयाच्या जलजीवन अभियाना अंतर्गत, प्रत्येक घराला पाणी मिळेल यादृष्टीने कार्यान्वन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

अनेक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग, महानगरपालिका आणि अन्य जल प्राधिकारणांनी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, कारण यामुळे मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत होणार आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने जल तंत्रज्ञान प्रयत्नांतर्गत, हा उपक्रम मागणीवर आधारित पाणी पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी, खर्चिक पायाभूत सुविधा घटकांची आवश्यकता कमी करेल तसेच व्यवस्थेचे कार्यान्वयन सुधारेल. 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691618) Visitor Counter : 197