माहिती आणि प्रसारण मंत्रालय

जागतिकीकरण झालेल्या जगात मानवी संबंधांच्या उणीवेला बॉर्डर हे माझे उत्तर होते ”: दिग्दर्शक डेव्हिडे डेव्हिड

पणजी, 22 जानेवारी 2021

मी चित्रपटात असे नाट्य  निर्माण करण्याचा प्रयत्न केला की आपण एकमेकांमध्ये अडथळे निर्माण करत  असलो तरी शेवटी  आपण एकाकीच असतो ,हा विरोधाभास  दाखवला आहे , असे दि बॉर्डर/ ला फ्रॉन्टेरा या वर्ल्ड पॅनोरामा  मधील चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिडे डेव्हिड यांनी म्हटले आहे. ते  51 व्या  भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज 22 जानेवारी 2021 रोजी आयोजित  पत्रकार परिषदेत बोलत होते.

नायिका  म्हणून काम करणारी अँडियन महिला अत्यंत दारिद्रयात राहत असल्याचे या चित्रपटात  दाखवण्यात आले आहे. मात्र  कथा जसजशी पुढे जाते तसतसे तिला हे जाणवते की ती जशी जगत होती त्यातच ती आनंदी होती. कथेत वळण आल्यानंतर तिला हे समजले की ती आपल्या कुटुंबाबरोबर आनंदात आहे आणि कुटुंबात असल्याची भावना पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.  यात आणखी काही पात्रं आहेत, ज्यांना तिला आपल्या कुटुंबात आणायचं आहे. भ्रष्टाचार, आरोग्य, शिक्षण आणि पाण्याची अनुपलब्धता आणि सीमावर्ती बंदीमुळे उद्‌भवलेली संकटे , विविध  संस्कृतींचे सह अस्तित्व या काही संकल्पना या चित्रपटात आहेत. 

लॅटिन अमेरिकन देश कोलंबियाचा रहिवासी असलेला आणि बार्सिलोना येथे शिकण्यासाठी गेलेला डेव्हिड या विषयावर चित्रपट कसा बनवला ते सांगतो. 2016  मध्ये जेव्हा त्याने एक  चित्रपट बनवण्याचा विचार केला तेव्हा त्याला पुन्हा आपल्या देशाला भेट देऊन त्यावर  चित्रपट बनवायचा होता. 2016 मध्ये कोलंबियन सरकार कोलंबियनबंडखोरांशी  शांतता करारावर स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न करत होते.  एक देश म्हणून आम्ही या कराराबद्दल अनभिज्ञ होतो.  शेजारच्या व्हेनेझुएलामध्ये ही  आर्थिक कारणामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत होते ,मात्र असे असूनही कोलंबिया आणि वेनेझुएला दरम्यानही यांच्यात संपर्क नव्हता.  मला वाटले की या सर्व ठिकाणी मानवांमध्ये काही संबंध नाही, जरी आपण जागतिकीकरण झालेल्या जगात राहत आहोत आणि ज्याचा आपल्याला अभिमान वाटत आला आहे. जरी  हे जग जोडलेले  असले तरी आपल्याला संवाद साधण्याचे चांगले मार्ग सापडले नाहीत.

या सर्व प्रश्नांना बॉर्डर हे माझे उत्तर होते. असे डेव्हिड म्हणतो,

कोलंबियामधील पॅसिफिक किनाऱ्यालगत  काली येथेही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्याच्या देशात नुकत्याच झालेल्या स्क्रीनिंगमध्ये (काली येथे) या चित्रपटाला  चांगला प्रतिसाद मिळाला.

कैरो चित्रपट महोत्सवात  (इजिप्त) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हा  चित्रपट  प्रीमियर म्हणून दाखवण्यात आला आणि  फेस्टिव्हल दि सिनेमा दि  ग्रॅमाडो (ब्राझील) येथे या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसह चार पुरस्कार जिंकले .

 

 

Jaydevi P.S/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691420) Visitor Counter : 285