रसायन आणि खते मंत्रालय
क्लिष्ट प्रमुख प्रारंभिक साधने / कच्चा माल म्हणून वापरली जाणारी घटक द्रव्य आणि प्रभावी औषधी घटक आदींच्या निर्मितीला उत्तेजन देण्यासाठी पीएलआय योजनेअंतर्गत अनुमती
Posted On:
22 JAN 2021 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021
क्लिष्ट प्रमुख प्रारंभिक साधने / कच्चा माल म्हणून वापरली जाणारी घटक द्रव्य आणि प्रभावी औषधी घटक आदींच्या निर्मितीला उत्तेजन देण्यासाठी पीएलआय योजनेअंतर्गत अनुमती देण्यात आली.
प्रस्तावित किमान वार्षिक उत्पादन क्षमते पेक्षा अधिक उत्पादन घेऊन निर्दीष्ट निकाश्यांची पूर्तता करणाऱ्या कंपन्यांचे अर्ज उत्पादन आधारित उत्तेजन (पीएलआ य) या योजने अंतर्गत क्लिष्ट प्रमुख प्रारंभिक साधने / कच्चा माल म्हणून वापरली जाणारी घटक द्रव्य आणि प्रभावी औषधी घटक आदींच्या निर्मितीला चालना देण्यासाठी स्वीकारण्यात आले आहेत.
या प्रकल्पांच्या उभारणी साठी सादर कंपन्यांना 3761 कोटी रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. या प्रकल्पांमुळे 3825 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत .
या कंपन्यांचे व्यावसायिक उत्पादन 1 एप्रिल 2023 पासून सुरु करण्याचे प्रस्थावित असून त्या करीत सरकार सहा वर्षांच्या कालावधीत कमल 3600 कोटी रुपयांपर्यंतचे उत्पादन आधारित उत्तेजन देणार आहे . या प्रकल्पांच्या उभारणी मुले आपला देश मोठ्या प्रमाणावर आवश्यक असणाऱ्या औषधी द्रव्यांबाबत आत्मनिर्भर ठरणार आहे.
भारतीय औषध उद्योग उत्पादनाच्या बाबतीत जागतिक स्थरावर सर्वाधिक उत्पादन घेणारा तिसरा मोठा देश आहे. या भारतीय उद्योगाची उत्पादने अमेरिका तसेच यूरोपीय देशांसारख्या प्रगत देशांमधील बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या उद्योगाची, विशेषतः जेनेरिक औषध निर्मिती क्षेत्रातील परवडणारी औषधे निर्मित करण्याबाबत जगभर ख्याती आहे. परंतु या उद्योगाकरिता लागणाऱ्या कच्च्या मालासाठी उदा. औषध निर्मितीकरिता वापरल्या जाणाऱ्या द्रव्यांसाठी आपला देश मुख्यत्वे आयातीवर अवलंबून आहे.
M.Chopade/S.Awate/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691413)
Visitor Counter : 220