माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रसृष्टीचा इतिहास हा चित्रपट शिक्षणाचा गाभा : एफटीआयआय प्रोफेसर पंकज सक्सेना यांचे 51 व्या इफ्फी मास्टरक्लास मध्ये प्रतिपादन
पणजी, 22 जानेवारी 2021
इतिहास नेहमी वर्तमानाला आकार देत असतो. चित्रसृष्टीचा इतिहास हा चित्रपट शिक्षणाचा गाभा आहे, ज्यांनी सिनेसृष्टीचा पाया घातला त्यांच्याविषयी जाणून घेणे महत्वाचे आहे. कलाकृती समजून घेण्यासाठी त्याच्या निर्मात्याला जाणून घेणे महत्वाचे असते असे मत चित्रपट निर्माते,माध्यम सल्लागार, प्रोफेसर पंकज सक्सेना यांनी 51 व्या इफ्फीमध्ये व्हर्च्युअल मास्टरक्लास मध्ये व्यक्त केले. ‘द बिगिनिंग ऑफ सिनेमा’ या विषयावर बोलत होते.
19 व्या शतकाच्या सुरवातीला निर्मिती झालेल्या चित्रपटांद्वारे त्यांनी चित्रपटांच्या इतिहासाची ओळख करून दिली. चित्रपट निर्मितीच्या सुरवातीच्या काळातल्या कृष्ण धवल चित्रपटांची त्यांनी माहिती दिली. 1890 मध्ये हलणारी म्हणजेच चलत चित्रे पाहून लोक प्रभावित झाले होते. एलीस यांनी सुमारे हजार चित्रपट केले त्यामध्ये 1896 मधल्या मूकपटाचा, द फेअरी ऑफ द की केबेज, ला फी ऑक्स चौक्स यांचा समावेश आहे.
1902 मध्ये ए ट्रीप टू द मून या साहस पटासाठी ओळखले जाणारे फ्रेंच जादुगार जॉर्ज मेलीस यांचाही त्यांनी दाखला दिला. मेलीस यांना सिनेमात तीच जादू दिसली आणि ते चित्रपट निर्माते झाले असे सक्सेना म्हणाले.
प्रोफेसर पंकज सक्सेना यांच्याविषयी :
पंकज सक्सेना (एफटीआयआय, चित्रपट दिग्दर्शन. 1985 ) हे एफटीआयआय मध्ये स्क्रीन स्टडी अँन्ड रिसर्चचे प्राध्यापक आहेत. ते चित्रपट निर्मातेही आहेत. चित्रपट संकलन पदवीधर आणि चित्रपट दिग्दर्शनात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रोफेसर सक्सेना यांनी शंभराहून अधिक माहितीपट,लघु कथापट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, जनसेवार्थ जाहिराती आणि न्यूज स्टोरी केल्या आहेत.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691383)
Visitor Counter : 170