श्रम आणि रोजगार मंत्रालय
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय अलिकडेच झालेल्या ऐतिहासिक कामगार सुधारणांवर आधारित चित्ररथ सादर करणार
Posted On:
22 JAN 2021 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अलिकडेच सरकारने केलेल्या ऐतिहासिक कामगार सुधारणा या विषयावर चित्ररथ आहे.या चित्ररथाची संकल्पना 'मेहनत को सम्मान ,अधिकार एक समान'ही असून त्याचा अर्थ परीश्रमांचा सन्मान आणि सर्वांना समान अधिकार असा आहे.
कामगार संहितेच्या अंमलबजावणी नंतर संघटीत आणि असंघटित क्षेत्रातील कामगार या सर्वांच्या जीवनात परिवर्तन होईल,असे या चित्ररथातील देखाव्यात दर्शवित आहे. कामगारांच्या सर्वांगीण विकासाचा आणि सुरक्षिततेचा उत्सव हा विचार या संकल्पनेमधे केला आहे.
या चित्ररथाच्या समोरील बाजूस एका हातात औजार घेतलेल्या आणि मार्ग अग्रेषित करणाऱ्या अत्यंत आत्मविश्वास असलेल्या आणि सामर्थ्यवान कामगाराचा विशाल पुतळा तयार केला आहे. त्याच्या माथ्यावरील पिवळी सुरक्षा टोपी ही श्रम सुधारणांनी दिलेली सामाजिक सुविधा, वेतन सुविधा आणि आरोग्य सुविधा दर्शविते.
चित्ररथाच्या मध्य भागात विविध उद्योगातील कामगारांची काम करतानाच्या विविध मुद्रा दाखविणारे,डीबीटी म्हणजे थेट हस्तांतरण योजना, मोबाईल ऍप आणि वैद्यकीय सहाय्य दर्शविणारे ‘स्वस्थ श्रमिक,स्वस्थ भारत’ हे फलक आहेत. ते त्यांना मिळणाऱ्या आरोग्य आणि आर्थिक संरक्षणाला अधोरेखित करते.
चित्ररथाच्या शेवटच्या भागात भागात सेफ्टी फर्स्ट अर्थात सुरक्षिततेला प्राधान्य असे लिहिलेल्या एका मोठ्या शिरस्त्राणाखाली कामगार आश्रय घेत असलेले दर्शविले आहे. चोवीस तास उपलब्ध असलेली सामाजिक सुरक्षितता आणि स्वच्छ कामाचे ठिकाण हा देखावा एका चाकांवर उभा केला आहे. चित्ररथाच्या समोर काही कलाकार दैनंदिन जीवनातील महत्वाच्या कामाचा उदाहरणार्थ डिलिव्हरी बॉय,मालवाहतूक कामगार आदी भूमिकांचे थेट सादरीकरण करतील.
Jaydevi P.S/S.Patgoankar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691298)
Visitor Counter : 121