माहिती आणि प्रसारण मंत्रालय

समाजातून बहिष्कृत केलेल्या लोकांना आपले खरेखुरे लक्ष आणि देखभाल हवी आहे: तेनचे दिग्दर्शक गणेश विनायक

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021

त्याच्या प्रिय व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या दुर्गम खेड्यात नेण्यासाठी रुग्णालयाच्या एका रुग्णवाहिका चालकाने त्याच्याकडे पैशाची मागणी केली. मागणी पूर्ण करण्यास असमर्थ असल्यामुळे अखेर शेवटचे विधी पूर्ण करण्यासाठी त्याला मृतदेह आपल्या खांद्यावरून दुर्गम गावात घेऊन जावे लागले. खरोखर हृदय पिळवटून टाकणारी ही वास्तविक जीवनातील ही घटना आहे. अशा कठीण काळात तो आणि त्याची लहान मुलगी कोणत्या भावनिक तणावातून गेले असतील. हे समाजाने समजून घेणे आवश्यक आहे. 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा गटातील तेन या चित्रपटाचे दिग्दर्शक गणेश विनायक यांनी हे मत मांडले. ते आज 22 जानेवारी 2021 रोजी गोव्यात या महोत्सवादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटातही या चित्रपटाची निवड झाली आहे.

तेन म्हणजे तामिळ भाषेत मध असा अर्थ असून हा चित्रपट तामिळनाडूच्या कुरुंजीकुडी येथील नीलगिरी जंगलाच्या डोंगराळ गावात राहणारा मधमाशी पालक वेलू याची कथा सांगतो. शेजारच्या खेड्यातील पुंगोडी तिच्या आजारी वडिलांच्या उपचारांसाठी कुसुवन मध (औषधी मध) नेण्यासाठी वेलू याला भेटते. कालांतराने ती वेलूच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करते. ते वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत असतात. त्यांना एक मुलगी होते , मलार तिचे नाव असते. नंतर, पूंगोडीला जीवघेण्या आजाराचे निदान होते. या रोगाशी लढताना वेलू, पुंगोडी आणि मलार यांच्या जीवनात अनेक चढउतार येतात. व्यवस्था आणि समाज यावर मात करण्यासाठी कुटुंबाचा खडतर प्रवास हा या प्रेमकथेचा विषय आहे.

विनायक यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी कुठून प्रेरणा मिळाली ते सांगितले. या चित्रपटावर सत्य घटनेचा प्रभाव असून त्यातूनच प्रेरणा मिळाली आहे. "

चित्रपटाचा संदेश काय आहे? विनायक म्हणतात: समाजातून बाहेर टाकलेल्या , बहिष्कृत लोकांना, आपले लक्ष आणि देखभालीची खूप गरज असते. कारण कुणीही त्यांना कुठलीही मदत देण्यासाठी पुढे येत नाही. या लोकांपर्यंत पोहचणे जे दुर्लक्षित आहेत , हा संदेश माझ्या कामातून मला सांगायचा आहे.

पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले वेलूची भूमिका साकारणारे प्रमुख अभिनेते थरुन कुमार यांनी सांगितले की, या भूमिकेसाठी चपखल बसण्यासाठी त्यांना स्वतःत मोठा बदल करावा लागला. हा मी केलेल्या सर्वात मोठ्या आणि कठीण चित्रपटांपैकी एक आहे. आदिवासी गावकरी साकारणे ही खूप कठीण भूमिका होती.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691256) Visitor Counter : 237