पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

वायू गुणवत्ता आयोगाने निर्णय समर्थन प्रणाली स्थापन करण्यासाठी उच्च तांत्रिक संस्थांची मदत घेतली

Posted On: 22 JAN 2021 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021

एनसीआर आणि त्याच्या आसपासच्या भागातील वायु गुणवत्ता व्यवस्थापन संबंधी आयोगाने (सीएक्यूएम) वेब, जीआयएस आणि मल्टी-मॉडेल आधारित परिचालन आणि नियोजन निर्णयाला सहाय्य करणारी निर्णय समर्थन प्रणाली (डीएसएस) स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली.

यामुळे विविध स्त्रोतांमधून उत्सर्जनाची स्थिर आणि गतिशील वैशिष्ट्ये मिळवण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल. रासायनिक परिवहन मॉडेल वापरुन प्राथमिक आणि दुय्यम प्रदूषक हाताळण्यासाठी यात एकात्मिक चौकट असेल. ही प्रणाली चौकटीत विशिष्ट बदल करण्यासाठी सक्षम असेल आणि वेगवेगळ्या वापरकर्त्यांसाठी वापरायला सोपी आणि साध्या स्वरूपात सर्वोत्तम परिणाम सादर करण्यावर भर असेल.

आयोगाने देशातील नामांकित ज्ञान संस्थांमधील तज्ज्ञ गटांकडे हे काम सोपवले आहे.

वायू गुणवत्ता व्यवस्थापन निर्णय समर्थन टूल (डीएसटी), उत्सर्जन साठा विकास वापर आणि डेटाबेस, प्रादेशिक, स्थानिक आणि स्त्रोत-रिसेप्टर मॉडेलिंग; आणि भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित व्हिज्युअलायझेशन टूल्स एकत्रित करते जेणेकरून दिल्ली/एनसीआर मधील लक्ष्यित क्षेत्रांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्याकरिता, स्त्रोत विशिष्ट उपाययोजना आखण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक सशक्त प्रणाली तयार करता येईल.

 

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1691232) Visitor Counter : 121


Read this release in: English , Hindi , Punjabi , Tamil