गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे 55 कोटी रुपये खर्च करून नव्याने निर्मित केलेल्या थलतेज-शीलाज- रांचरदा चौपदरी


रेल्वे ओव्हरब्रिजचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले

Posted On: 21 JAN 2021 9:48PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे 55 कोटी रुपये खर्च करून नव्याने निर्मित केलेल्या थलतेज-शीलाज-रचराडा रेल्वे ओव्हरब्रिजचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज नवी दिल्ली येथे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील अडचणी सोडवण्याची मोहीम सुरू केली असल्याचे अमित शहा यांनी यावेळी सांगितले. देशातील एक लाखाहून अधिक रेल्वे क्रॉसिंगवर रहदारीची मोठी समस्या होती. रेल्वे फाटक दिवसातून 100 पेक्षा जास्त वेळा खुले आणि बंद होत असल्यामुळे इंधन व वेळ वाया जायचा. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेऊन रेल्वेमंत्री  पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात एक मोठी मोहीम सुरू केली गेली ज्यामध्ये या एक लाख रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हरब्रिज किंवा अंडरब्रिज बांधण्याचे काम सुरू केले गेले. आज याच योजनेंतर्गत या ओव्हरब्रिजचे उद्घाटन करण्यात आले आहे.

तपशीलासाठी कृपया पहा

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691050) Visitor Counter : 131


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri