माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘लाँग टाइम नो सी’ सारख्या चित्रपटांचे चित्रीकरण वास्तविक स्थळीच केले पाहिजे, स्टुडीओमध्ये वास्तवाला मर्यादा असतात: दिग्दर्शक पियर फिल्मन
विभक्त झाल्यानंतर ते नऊ वर्षांनी भेटले होते. त्यांचा प्रवास सुरुवातीपासून आठवण्यासाठी, त्यांच्या आयुष्याचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी, त्यांचे सत्य, खेद आणि आठवणींचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे ऐंशी मिनिटे होती. थोडक्यात, ‘लाँग टाइम नो सी’ या फ्रेंच चित्रपटाच्या कथेचे वर्णन याप्रमाणे केले जाऊ शकते.
पियर फिल्मन द्वारा दिग्दर्शित 'लाँग टाइम नो सी' हा चित्रपट दोन व्यक्तींच्या जीवनात घडलेल्या बारकाव्यांची कथा आहे, थोड्या काळासाठी का नाही पण भूतकाळात हे दोघे एकमेकावर जीवापाड प्रेम करायचे आणि अगदी अनपेक्षितरित्या नऊ वर्षा नंतर ते रेल्वे स्टेशनवर भेटले आणि त्यांच्याकडे केवळ 80 मिनिटे होती. या चित्रपटाची पटकथा देखील पियर फिल्मन यांनी लिहिली आहे.
या चित्रपटाच्या लिखाणासाठी मला पाच वर्षाचा कालावधी लागला परंतु या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मला केवळ 5 दिवस पुरेसे होते कारण यांचे चित्रीकरण लॉंग शॉट मध्ये केले होते.” पणजी, गोवा येथे आयोजित 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज 21 जानेवारी 2021 रोजी दिग्दर्शक पत्रकारांशी संवाद साधत होते.
फिल्मन यांनी सांगितले की ते तरुण असताना या चित्रपटाची पटकथा लिहायला सुरुवात केली होती. “ दोन जण रुग्णालयात भेटले अशी पटकथा मी लिहिली होती. ते भेटले, प्रेमात पडले आणि त्यांच्यात काही उत्कट क्षण आले परंतु ते वेगळे झाले. ”
महोत्सवाच्या वर्ल्ड पॅनोरामा विभागांतर्गत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी फिल्मन एका भावनिक प्रवासातून गेले होते. “माझी पटकथा तयार होती पण जेव्हा त्याची निर्मिती करण्याची वेळ आली तेव्हा त्याच आशयाचा आणखी एक फ्रेंच चित्रपट आला; आणि यामुळे माझा चित्रपट तिथेच गारद झाला. यातून बाहेर यायला मला अनेक वर्षे लागली.
अशा चित्रपटांचे प्रत्यक्ष ठिकाणी चित्रीकरण करण्यामागचे महत्त्व सांगताना फिल्मन म्हणाले: “पूर्णत: स्टुडिओमध्ये चित्रीकरण केलेला एक लघुपट मी बनविला होता परंतु अशा आशयाच्या चित्रपटांचे चित्रीकरण वास्तविक स्थळीच केले पाहिजे कारण स्टुडीओमध्ये चित्रीकरण करताना वास्तवाच्या काही मर्यादा असतात.”
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690979)
Visitor Counter : 285