संरक्षण मंत्रालय

भारतीय सैन्याने एसआयडीएमबरोबर स्वदेशीकरण आणि नावीन्यपूर्ण संशोधन संबंधी भागीदारीबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली

Posted On: 21 JAN 2021 5:22PM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांच्या 'आत्मनिर्भर भारत' ध्येयाअंतर्गत स्वदेशीकरणला आणखी चालना देण्यासाठी आणि परदेशातील सामुग्रीवरील अवलंबित्व कमी करून सामरिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीय सैन्य आणि सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएम) यांच्यात 21 जानेवारी 2021 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय उद्योग महासंघाबरोबर (सीआयआय) सैन्य-उद्योग भागीदारीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने हा सामंजस्य करार करण्यात आला.  भारतीय सैन्य आणि उद्योग यांच्यातील सहकार्य 1995 मध्ये सुट्या भागांच्या स्वदेशी निर्मितीतून सुरू झाले आणि त्याची प्रगती मुख्य संरक्षण प्लॅटफॉर्म आणि विविध शस्त्रे आणि उपकरणांच्या निर्मितीपर्यंत झाली.

आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये भारताचे स्थान उंचावल्यामुळे वाढलेली सुरक्षा आव्हाने, निराकरण न झालेल्या सीमा समस्या आणि देशविरोधी कारवाया या समस्या  सोडवण्यासाठी आधुनिकीकरणाच्या माध्यमातून सैन्याची सातत्यपूर्ण आणि एकत्रित क्षमता वाढवणे आवश्यक आहे. हे स्वदेशी निर्मित उपकरणांसह सैन्याला सुसज्ज करून केले जाऊ शकते.

लष्कराच्या सक्रिय पाठिंब्याने स्वदेशीकरणासाठी आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साधण्यासाठी सरकारने  धोरणात आवश्यक बदल केले आहेत. एसआयडीएम बरोबर सामंजस्य करारासह, भारतीय लष्कराने संरक्षण उद्योगाला आधार आणि मार्गदर्शन देऊन स्वयंपूर्णता संपादन करण्याच्या आपल्या दृढ निश्चयाचा पुनरुच्चार केला.

 

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1690900) Visitor Counter : 228