माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अहिंसा- गांधी: अहिंसेच्या संदेशाचा जागतिक प्रभाव आणि अधिकार नसलेल्या सामान्यांच्या सामर्थ्याचा प्रभाव दाखवणारा माहितीपट- दिग्दर्शक रमेश शर्मा
अहिंसेचे सामर्थ्य आणि आजच्या काळातही त्याचे महत्व किती सुसंगत असल्याचे स्पष्ट करणारा माहितीपट: एडिटर यामिनी उपाध्ये
दोनच पर्याय आहेत- एक अहिंसा अथवा अस्तित्वहीनता
गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या 51व्या इफ्फीमध्ये अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमामध्ये नॉन-फीचर फिल्म विभागात ‘‘अहिंसा-गांधीः द पॉवर ऑफ द पॉवरलेस’ या चित्रपटामध्ये महात्मा गांधींजीच्या अहिंसेच्या तत्वज्ञानामध्ये किती महान शक्ती दडलेली होती. सामान्यांच्या म्हणजेच कोणतेही अधिकार नसलेल्या समाजामध्येही किती अफाट सामर्थ्य असते. गांधींजींनी दिलेला अहिंसेचा संदेश आजच्या काळातही सुसंगत आहे. अंहिसेचा विचार कालातीत आहे, याचे दर्शन घडविणारा हा चित्रपट आहे. अशी माहिती या माहितीपटाचे दिग्दर्शक रमेश शर्मा यांनी दिली. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाने अनेक जागतिक नेत्यांना प्रेरणा दिली आहे. अमेरिकेतली नागरी अधिकार चळवळ, पोलंडमधली एकता चळवळ त्याचबरोबर नेल्सन मंडेला यांनी दक्षिण अफ्रिकेमध्ये उभी केलेती वर्णभेदाविरोधातील चळवळ अशा अनेक आंदोलनामागे गांधीजींच्या अहिंसेचा विचार होता, असे रमेश शर्मा यांनी यावेळी सांगितले. महात्मा गांधीजी यांची यंदा 150 जयंती साजरी केली जात आहे, यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी या माहितीपटाची निर्मिती केली असल्याचेही त्यांनी सांगितले. इफ्फीच्या निमित्ताने आज आयोजित आभासी पत्रपरिषदेत शर्मा बोलत होते.
‘अहिंसा-गांधी’ हा काही फक्त माहितीपट नाही, मात्र सर्व मानवजातीला हक्क, अधिकार आणि प्रत्येकाला सन्मानाची वागणूक मिळण्याची गरज आहे, हा विचार विश्वस्तरावर नेण्याची आवश्यकता आहे, या आंतरिक उत्कटतेने अहिंसा -गांधी चित्रपट तयार करण्यात आला आहे, असे दिग्दर्शक शर्मा यांनी यावेळी मनोगत व्यवत केले. गांधीजींनी दिलेल्या अहिंसेच्या संदेशाला कोणत्याही देशाची सरहद्द नाही की कालमर्यादाही नाही, इतका हा संदेश कालातीत आणि वैश्विक आहे. आजच्या समाजालाही अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरणा देणारा आहे, असेही शर्मा म्हणाले. गांधीजींविषयी बोलताना रमेश शर्मा म्हणाले, ‘‘ ही व्यक्ती सर्वांना समावून घेणारी होती. प्रत्येकाचा धर्म आणि प्रत्येकाची श्रद्धा यांचे स्वतःचे असे विशिष्ट स्थान आहे, असा विश्वास त्यांना होता. अलिकडच्या काळात सर्वसमावेशाच्या वस्त्राचे धागे थोडे विरळ होत आहेत, त्याबद्दल भीती वाटत होती. त्याचबरोबर भारत एका विशिष्ट धर्माचे राष्ट्र बनावे, असे गांधीजींना वाटत नव्हते.’’
या माहितीपटाच्या एडिटर यामिनी उपाध्याय यासुद्धा गोवा येथून पत्रपरिषदेत सहभागी झाल्या होत्या. ‘‘ या माहितीपटाच्या एडिटरचे कार्य म्हणजे एखद्या गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा अनुभव देणारे ठरले. दिग्दर्शक रमेश यांच्याबरोबर नवे खूप काही शिकता आले, ’’ असे यामिनी उपाध्याय यावेळी म्हणाल्या.
या माहितीपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही रमेश शर्मा यांनी केली आहे. त्यांच्या ‘‘ द जर्नलिस्ट अँड द जिहादी: द मर्डर ऑफ डॅनिअल पर्ल’’ या चित्रपटाला ‘एमी’ मध्ये नामांकन मिळाले होते. उत्पादन आणि हक्क विक्रीचे कार्य दक्षिण आफ्रिकास्थित ‘डिस्टंट होरायझन’व्दारे करण्यात आले आहे.
***
M.Chopade/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690892)
Visitor Counter : 291