माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मुलांवर दोष देऊ नका, मुलांच्या विकासाची जबाबदारी समाजाने देखील घ्यावी: जादू, दिग्दर्शक
पणजी, 20 जानेवारी 2021
“प्रत्येक मूल किंवा विद्यार्थी हे वेगळ्या आकाराचे आणि वेगळ्या झाकण असलेल्या बाटलीसारखे आहे. जेव्हा ते काही शिकण्यात अयशस्वी होतात तेव्हा तो त्यांचा दोष नसतो, त्या बाटलीचे झाकण उघडून त्यात काहीतरी भरीव ओतण्यात अयशस्वी झालेले शिक्षक आणि समाजाचा तो दोष असतो. 51 व्या इफ्फिमध्ये भारतीय पॅनोरामा नॉन फिचर फिल्म विभागात प्रदर्शित केलेल्या '' जादू '' या चित्रपटाच्या दिग्दर्शक शूरवीर त्यागी यांनी हा संदेश दिला आहे. गोवा येथे आयोजित 51 व्या इफ्फी सोहळ्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
जादू हा एक बहुआयामी चित्रपट आहे ज्यात मुलांचे भावविश्व, त्यांच्या भावना आणि विचार यांचे चित्रण केले आहे. ही कथा आहे त्विषा आणि भक्ती या दोन लहान मुलींची ज्यांना दोन वेगवेगळ्या वर्गातून शिक्षा म्हणून वर्गाच्या बाहेर उभे केले जाते आणि या अशा परिस्थिती मध्ये या दोघींची मैत्री कशी फुलते याचे चित्रीकरण यात केले आहे.
दिग्दर्शकाच्या मते, मुलांना घडविण्यात पालक आणि शिक्षक यांच्यापेक्षा समाज खूप मोठी भूमिका बजावतो. मुलांचे आयुष्य साकारण्याची जबाबदारी केवळ पालक किंवा शिक्षकांपुरती मर्यादित नाही. मोठ्या प्रमाणात ती जबाबदारी समाजाची देखील आहे. परंतु, त्याच वेळी हे देखील खरे आहे की पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात. मुलांचे आंतरिक जग समजून घेण्यासाठी ते सक्षम असले पाहिजेत. मुलांना त्यांच्या पातळीवर जाऊन शिकविण्याची, समजावण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी त्यांची भाषा समजून घ्यायला हवी. ”
या ठिकाणी आजी-आजोबांची भूमिका खूप महत्वाची असते असे त्यागी म्हणाले. दिग्दर्शक लहान मुलांसाठी नाटक आणि अभिनय कार्यशाळेचे आयोजन देखील करतो. “जेव्हा एखादी वयोवृद्ध व्यक्ती मारते तेव्हा हजार पुस्तकांचे ग्रंथालयाला देखील वणवा लागतो, अशी म्हण आहे. मुलांच्या संगोपनात आजी-आजोबा उत्तम भूमिका बजावतात. आम्हाला आपल्या मुलांशी परत जाण्याची आणि जुन्या आणि नवीन पिढीमध्ये पुलाची भूमिका बजावण्याची गरज आहे. जेहा जुन्या आणि नवीन पिढीत दृढ संबंध असतात तेव्हा चांगली मुल्ये विकसित होतात.”
* * *
Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690622)
Visitor Counter : 310