गृह मंत्रालय
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) आज आपला 16 वा स्थापना दिन साजरा केला
Posted On:
20 JAN 2021 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) आज आपला 16 वा स्थापना दिन साजरा केला. या निमित्ताने नवी दिल्ली येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दलातील जवान व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना श्री नित्यानंद राय म्हणाले की आजचा हा दिवस म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने उच्चस्तरीय व्यावसायिक कौशल्ये, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम करून केलेल्या कामगिरीचे स्मरण करण्याचा दिवस आहे.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने, एनडीआरएफमध्ये महिलांचा देखील समवेश करण्यात आला आहे, ज्या प्रत्येक आपत्तीमध्ये परुष सहकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत महत्वाची भूमिका बजावत आहेत,असे राय यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आस्थेचा विषय असून गेल्या वर्षी देशात आलेल्या विविध आपत्तींच्या काळात पंतप्रधानांनी स्वतः गृह मंत्रालय आणि संबंधित राज्य सरकार यांच्यासमवेत एनडीआरएफच्या सज्जतेचा आढावा घेतला असे मंत्री म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्ती व्यवस्थापन कामांचा आणि योजनांचा आढावा घेतला आणि एनडीआरएफला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले असे नित्यानंद राय यांनी सांगितले.
* * *
Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690613)
Visitor Counter : 308