नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

सौर ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात सामंजस्य करार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 20 JAN 2021 12:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जानेवारी 2021

 

सौर ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात सामंजस्य करार करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (एनआयएसई), भारतीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (आयएसईआय), उझबेकिस्तान यांची संशोधने / प्रात्यक्षिके / प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प जाणून घेण्यावर मुख्य भर असून सौर फोटोव्होल्टिक, साठवण तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यात मुख्यतः संशोधन होणार आहे. 

परस्पर कराराच्या आधारे, उभय देश आंतरराष्ट्रीय सौर करारातील (आयएसए) सदस्य देशांमध्ये प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाची अंमलबजावणी आणि तैनातीचे काम करतील.


* * *

U.Ujgare/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1690301) Visitor Counter : 124