पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
धूळ आणि संबंधित वायू प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील तपासणी पथकांनी अनुपालन न करणाऱ्या संस्थांवर सुमारे 76 लाख रुपये दंड आकारला
Posted On:
19 JAN 2021 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021
बांधकाम आणि पाडकामादरम्यान धूळ आणि संबंधित वायू प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने, दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागासाठी वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, हरियाणा , राजस्थान , उत्तर प्रदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला एनसीआरमध्ये बांधकाम आणि पाडकामाशी संबंधित प्रकल्पांचीआणि वाहतुकीची तपासणी करण्यासाठी विशेष पथके स्थापन करून तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले.
या संस्थांकडून 31.12.2020 ते 15.01.2021 दरम्यान 1600 हून अधिक बांधकाम आणि पाडकाम सुरु असलेल्या ठिकाणी सुमारे 174 पथके तयार करून तपासणी केली गेली . यापैकी 119 ठिकाणी बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम / मार्गदर्शक तत्त्वे आणि धूळ कमी करण्याच्या उपायांचे पालन केले जात नसल्याचे आढळले.
दोषी संस्थांविरुद्ध सुमारे 51 लाख रुपये पर्यावरण नुकसान भरपाई शुल्क म्हणून आकारण्यात आले असून त्याशिवाय 27 ठिकाणी काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 563 वाहनांकडून बांधकाम आणि पाडकाम साहित्याच्या वाहतुकीशी संबंधित मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याबद्दल 25 लाख रुपये पर्यावरण भरपाई शुल्क आकारण्यात आले आहे.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690156)
Visitor Counter : 166