रेल्वे मंत्रालय

पोलादाची वाहतूक आणि त्यासाठी वाघिणींची सोय करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नवे पोलाद धोरण जाहीर


नवे ‘पोलाद धोरण 2021’ हे 10.02.2021पासून अमलात येईल

Posted On: 16 JAN 2021 10:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

पोलादाच्या वाहतूकीसाठी रेल्वेवाघिणींच्या नियमनासाठी  नवीन पोलाद धोरण आज भारतीय रेल्वेकडून जाहीर झाले.  ग्राहकांच्या गरजांनुसार निर्णय घेऊन पोलादाच्या रेल्वेवाहतूकीच्या दृष्टीने पूर्ण जबाबदारी घेत ग्राहकांना आश्वस्त करणे आणि देशातील स्टीलउद्योगाला जागतिक पातळीवर स्पर्धात्मकरित्या सक्षम बनवण्यासाठी वाहतूकीच्या माध्यमातून मदतीचा हात देणे हा या धोरणाचा उद्देश आहे.  स्टील उद्योगाचे उत्पादन हे प्रामुख्याने पोलाद व इतर कच्च्यामालाचा पुरवठा यावर थेट अवलंबून असते. नव्या धोरणात ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार  माल घेणे व उतरवणे यासाठी मुलभूत सोयीसुविधांचा  यथासांग वापर करण्याबाबत स्पष्ट निर्देश आखून दिले आहेत. ‘पोलाद धोरण 2021’ असे या नव्या धोरणाचे नामकरण करण्यात आले असून ते 10.02.2021 पासून अमलात येईल. या नव्या धोरणाच्या दृष्टीने CRIS ची वाघिणी नेमणूक व्यवस्था (रेक एलॉटमेंट सिस्टीम) अद्ययावत करण्यात आली आहे.

नव्या धोरणातील लक्षणीय बाबी:

  • सध्या ग्राहकांच्या माहितीवरून त्यांचे CBT/Non CBT असे केले जात असलेले वर्गीकरण न करणे.
  • वाघिणीची सोय पुरवणे व मालाची चढउतार या बाबतीत नवे आणि जुने प्रकल्प यात डावेउजवे न करता समान धोरण.
  • पोलादाच्या वाहतूकीचे प्राधान्यक्रम आता मालाच्या चढउतारासाठी ग्राहककेंद्री मुलभूत रेल्वे सोयीसुविधांनुसार व त्याचे स्वरूप वेगवेगळ्या मार्गांचा (साईडिंग्जचा) वापर करत रेल्वेकडून  अधिकाधिक माल वाहतूक होण्याच्या दृष्टीकोनातून ठरवले जाईल.
  • ग्राहकांना दिला जाणारा प्राधान्यक्रम रेक अॅलोटमेंट सिस्टीम या व्यवस्थेतून ग्राहकांच्या माहितीवर आधारीत स्वनिर्मित असेल. (उत्पादकाचे नाव, मालवाहतूकदाराचे नाव, मालवाहतूक, साईडिंग/ PFT नाव व कोड अशी संबधित विभागवार माहिती या व्यवस्थेत नमूद असते.)
  • पोलादाच्या  वाहतूकीसाठी स्वदेशी उत्पादन उद्योगांना प्राधान्य.
  • सुलभ करण्यासाठी कागदपत्रांच्या  छाननीचा टप्पा रेल्वेकडून वगळण्यात आला आहे.

रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने पोलादाची वाहतूक ही दुसऱ्या क्रमांकाची महत्वाची मालवाहतूक आहे आणि स्टीलच्या दृष्टीकोनातून वर्ष 2019-20मध्ये भारतीय रेल्वेच्या माध्यमातून झालेल्या एकूण 1210 दशलक्ष मालवाहतुकीपैकी पोलाद वाहतुकीचा वाटा  जवळपास  17% (53.81 दशलक्ष टन स्टील व 153.35 दशलक्ष टन लोहखनिज) होता.   

 

S.Kane/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689227) Visitor Counter : 201