पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
हरीत आणि स्वच्छ ऊर्जा याविषयी जनजागृती करण्यासाठी पीसीआरएच्या वतीने महिनाभर सक्षम जनजागरण मोहीमेचा प्रारंभ
Posted On:
16 JAN 2021 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021
जीवाश्म इंधनाबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम संवर्धन आणि संशोधन संस्थेने कार्बनच्या पदचिन्हांचा आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत महिनाभर चालणारी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव आणि पीसीआरएचे अध्यक्ष तरुण कपूर यांनी आज नवी दिल्ली येथे या मोहिमेचा प्रारंभ केला. ग्राहकांना स्वच्छ इंधन वापरण्यासाठी उद्युक्त करणे आणि जीवाश्म इंधन हुषारीने वापरण्यासाठी वर्तनात्मक बदल घडवून आणणे ,ही या सक्षम मोहीमेमागील संकल्पना आहे.
सायक्लोथॉन ,शेतकरी कार्यशाळा ,चर्चासत्रे, चित्रकला स्पर्धा ,सीएनजी वाहन चालवण्याची स्पर्धा अशा अनेक उपक्रमांमार्फत संपूर्ण देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराबाबत जनतेत जनजागृती केली जाईल. भारताची सामूहिकरीत्या स्वच्छ इंधनाकडे वाटचाल होण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच उल्लेख केलेल्या 7 महत्वाच्या बाबींबद्दलही या मोहिमेद्वारे जनजागरण केले जाईल.
या बाबी म्हणजे वायू आधारीत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, जीवाश्म इंधनाचा स्वच्छ उपयोग, जैव इंधनाचा वापर करण्यासाठी देशांतर्गत स्रोतांवर अधिक अवलंबून रहाणे, निर्धारित मुदतीसह अक्षय ऊर्जेचे लक्ष्य गाठणे,डिकार्बनाईझ करण्यासाठी (कार्बनचा वापर कमी करण्यासाठी )ईलेक्ट्रिक वाहनांचा वापर , हायड्रोजन सारख्या स्वच्छ इंधनांचा वापर आणि सर्व ऊर्जा प्रकारांमधे डिजिटल नाविन्य आणणे या आहेत.
यावेळी बोलताना तरुण कपूर यांनी ऊर्जा संवर्धनाच्या उपाययोजना तसेच स्वच्छ आणि हरीत ऊर्जा उपक्रमात विविधता आणण्यासाठी पावले उचलल्याबद्दल ऊर्जा कंपन्यांची प्रशंसा केली.
सचिवांनी तेल आणि वायू संवर्धनासाठी प्रतिज्ञा दिली. त्यांनी तेल आणि वायू संवर्धन क्षेत्रात अनुकरणीय कार्य करणाऱ्या राज्ये आणि तेल कंपन्यांना पुरस्कार तसेच प्रत्येक किलोमीटरला लीटरमधे सुधारणा दाखविणाऱ्यांना (KMPL )एसटीयू दिले. तसेच त्यांनी रीफायनरीजना पॅट सायकल-II मधे ही उत्तम कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार दिले.
यावेळी पीसीआरए आणि ईईएसएल यांच्यात ऊर्जा कार्यक्षम पीएनजी स्टोव्हचे संवर्धन करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689220)
Visitor Counter : 284