माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी हा अत्यंत महत्वाचा सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सव: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2021 11:11PM by PIB Mumbai
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फी 2021 हा अत्यंत महत्वाचा सांस्कृतिक तसेच सामाजिक उत्सवही आहे, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. गोव्यात उद्यापासून इफ्फीची सुरुवात होणार आहे.
“कोविड-19 महामारीचे संकट असतांनाही इफ्फीमध्ये जगभरातून 200 पेक्षा जास्त चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या. या महोत्सवात अनेकविध विषयांवरील चित्रपट दाखवले जातील आणि रसिकांना उत्तमोत्तम चित्रपटांची पर्वणी अनुभवता येईल. पहिल्यांदाच हा महोत्सव मिश्र म्हणजेच प्रत्यक्ष आणि ऑनलाईन स्वरूपात होत असल्यामुळे अनेकांना ऑनलाईन माध्यमातून महोत्सवात सहभागी होता येईल,” असं जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.
सर्व चित्रपट पणजी आणि आसपासच्या सात चित्रपट गृहांमध्ये दाखवले जातील तसेच कोविड प्रतिबंध विषयक सर्व प्रोटोकॉलचे पूर्ण पालन केले जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. आलेल्या प्रवेशीकांमधून चित्रपटांची निवड करण्याचं अवघड काम ज्युरींनी उत्तमरित्या केलं असंही जावडेकर म्हणाले.
चित्रपट रसिकांनी प्रत्यक्ष येऊन या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. गोव्यात महोत्सवासाठी येणाऱ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असेही ते म्हणाले.
51व्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण डीडी इंडिया आणि डीडी नॅशनल वाहिन्यांवरून केले जाईल अशी माहिती जावडेकर यांनी दिली.
या सोहळ्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पत्र सूचना कार्यालयाच्या यु ट्यूब चॅनेलवरून केले जाईल.
लिंक: https://www.youtube.com/pibindia
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1688968)
आगंतुक पटल : 100