कृषी मंत्रालय

सरकार आणि शेतकरी संघटनांमधील चर्चेची 9 वी फेरी  विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पार पडली


संवादाची पुढील फेरी 19 जानेवारी 2021 रोजी  होईल

Posted On: 15 JAN 2021 9:32PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग आणि  ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री  सोम प्रकाश यांनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 41 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीं बरोबर आज  झालेल्या चर्चेच्या 9 व्या फेरीत भाग घेतला. बैठकीच्या सुरुवातीला  तोमर यांनी मकर संक्रांती निमित्त शेतकरी संघटनांना शुभेच्छा दिल्या आणि आंदोलन शांततेने केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

शेतकरी संघटनांशी चर्चा  अनौपचारिक गटात सुद्धा होऊ शकते त्यामुळे  पुढे जाण्याचा मार्ग सापडेल असे कृषीमंत्र्यांनी सुचवले. ते म्हणाले की ,लोकशाहीत सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा सन्मान करते. वादग्रस्त विषयांवर मुद्देसूद चर्चा होऊ शकते असे तोमर यांनी पुन्हा एकदा सांगितले. देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे  आणि देशभरातील बरेच शेतकरी या नवीन कृषी कायद्याचे समर्थन करत आहेत असे सांगत  ते म्हणाले की, या हंगामात किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) शेतकऱ्यांकडून खरेदी वाढली आहे आणि खरेदी केंद्रेही वाढली आहेत.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष  गोयल यांनी चर्चेदरम्यान अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा ,  2020 मधील तरतुदी स्पष्ट केल्या. या कायद्याचा कृषी क्षेत्र आणि शेतकर्‍यांना कसा फायदा होईल, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

संवाद हाच पुढे जाण्याचा मार्ग असल्याने पुढील  चर्चा 19 जानेवारी 2021 रोजी होईल असे परस्पर सहमतीने ठरवण्यात आले.

 

Jaydevi P.S/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688932) Visitor Counter : 164