इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

एनआयसीने सीबीएसई आणि नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) सह संयुक्तपणे सीबीएसई संलग्न शाळांसाठी कोलाबकॅड सॉफ्टवेअर आणि विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी ई-बुक प्रकाशित केले

Posted On: 14 JAN 2021 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जानेवारी 2021

 

नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), शिक्षण मंत्रालय यांनी नीती आयोगाच्या  अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम)च्या सहकार्याने कोलाबकॅड सुरु केले आणि कोलाबकॅड 3 डी मॉडेलिंग विषयी सर्वसमावेशक ई-बुकचे प्रकाशन केले. या आभासी कार्यक्रमाला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय सावनी, एनआयसीच्या महासंचालक डॉ.नीता वर्मा, अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम)चे मिशन संचालक रामानन रामनाथन, सीबीएसई अध्यक्ष मनोज आहुजा, डॉ. अंत्रीकश जोहरी आणि एनआयसी आणि सीबीएसई मधील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एनआयसी आणि सीबीएसई यांनी 10 वर्षांच्या कालावधीसाठी ‘सीबीएसई संलग्न शाळांमध्ये दहावी आणि बारावीसाठी अभियांत्रिकी ग्राफिक्स अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कोलाबकॅड सॉफ्टवेअर सहाय्य आणि प्रशिक्षणासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

आभासी कार्यक्रमा दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजित सहानी यांनी एनआयसी आणि कोलाबकॅडच्या संपूर्ण चमूचे या प्रयत्नांसाठी अभिनंदन केले.

भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी)च्या भागीदारीने एनआयसीने तयार केलेले पहिले कोलाबकॅड हे पहिले स्वदेशी साधन आहे. ही एक सहकार्यात्मक नेटवर्क-सक्षम आणि डेस्कटॉप सॉफ्टवेअर प्रणाली आहे, जी अभियांत्रिकी ग्राफिक्स अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी 2 डी ड्रफ्टिंग आणि डिटेलिंग पासून 3 डी उत्पादनाच्या डिझाइनचे संपूर्ण अभियांत्रिकी समाधान प्रदान करते

कोलाबकॅड-3डी मॉडेलिंग 1.0 वरील सर्वसमावेशक ई-पुस्तक नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी कोलाबकॅड पोर्टलच्या माध्यमातून सार्वजनिक प्रकाशनासाठी सज्ज आहे आणि सीएडी विद्यार्थ्यांना, नवशिक्यांना आणि व्यावसायिकांना कोलाबकॅड सॉफ्टवेअर समजून घेण्यास व त्यांचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करेल. एनआयसी, नवी दिल्लीच्या कोलॅबकॅड समूहाने याची रचना व लेखन केले आहे. 


* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688664) Visitor Counter : 145