रेल्वे मंत्रालय
प्रवाशांकडून रेल्वे अतिरिक्त भाडे आकारत असल्याचे काही माध्यमांमधील वृत्त दिशाभूल करणारे आणि तथ्यहीन
Posted On:
14 JAN 2021 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2021
प्रवाशांकडून रेल्वे अतिरिक्त भाडे आकारत आहे, याबाबत काही माध्यमांमधील वृत्त दिशाभूल करणारे आणि निराधार आहे आणि त्यात अजिबात तथ्य नाही.
गर्दी कमी करण्यासाठी नेहमीच्या प्रथेप्रमाणे उत्सव / सुट्टी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. उत्सव सुरूच आहेत आणि आजही कापणीचा सण साजरा केला जात आहे. यावर्षी ज्या मार्गावर अनेक उत्सव विशेष गाड्या चालू आहेत तिथे मागणी वाढली आहे. गर्दी कमी करण्यासाठी या विशेष गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत.
2015 पासून अशा गाड्यांचे भाडे थोडे जास्त ठेवण्यात आले आहे. यावर्षी काही नवीन केलेले नाही. ही एक प्रस्थापित प्रथा आहे.
प्रवासी वाहतुकीला नेहमीच रेल्वेकडून अनुदान दिले जाते. प्रवासी वाहतुकीत रेल्वे नुकसान सोसत आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत रेल्वे कोविड काळात गाड्या चालवत आहे. बऱ्याच मार्गावर कमी प्रवासी संख्येने लोक कल्याणास्तव रेल्वेगाड्या सुरु आहेत.
चालवल्या जात असलेल्या सर्व गाड्यांमध्ये इतर श्रेणी व्यतिरिक्त मोठ्या संख्येने 2 एस श्रेणीचे डबे आहेत ज्यांचे भाडे आरक्षित प्रवर्गामध्ये सर्वात कमी आहे.
40% प्रवाशांनी कोविडपूर्व अनारक्षित प्रवासाच्या परिस्थितीपेक्षा 2 एस श्रेणीत अधिक चांगला प्रवासाचा अनुभव घेतला आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688588)
Visitor Counter : 199