मंत्रिमंडळ

केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय हवाई दलासाठी कमी वजनाच्या लढावू (LCA)‘तेजस’ या 83 विमानांची HALअर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून खरेदी करायला दिली मंजुरी

Posted On: 13 JAN 2021 9:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील 13 जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत  एलसीए तेजस  Mk-1A ही  73 लढावू विमाने आणि  एलसीए तेजस Mk-1 या 10 प्रशिक्षण विमानांच्या 45,696 कोटीं रुपयांच्या  खरेदीस मंजूरी दिली. याशिवाय डिझाईन व मुलभूत सोयीसुविधांच्या  विकासासाठी  1,202 कोटींच्या  रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली.

एलसीए  तेजस Mk-1 हे देशात अभिकल्पित केलेले, अत्याधुनिक 4+ जनरेशनचे लढावू विमान आहे. हे विमान इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड एरे (AESA) रडार, बियॉन्ड विज्युअल रेंज (BVR) क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक वारफेअर (EW)  स्विट, हवेतल्या हवेत इंधन भरण्याची सुविधा अश्या महत्वाच्या सुविधांसह भारतीय हवाईदलाची क्षमता वृद्धींगत करणारे एक महत्वाचे साधन आहे. 50टक्के स्वदेशी बनावटीच्या (भारतीय अभिकल्प, विकास आणि निर्मिती) लढावू विमानाच्या श्रेणीतील पहिले विमान आहे. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत यातील भारतीय बनावटीची भागीदारी 60%  होईल.  मंत्रिमंडळाने या परियोजने अंतर्गत आलेल्या मुलभूत सोयीसुविधांच्या  विकासालाही मंजुरी दिली आहे, जेणेकरून या विमानांची  दुरुस्ती व देखभाल हवाई तळावरील डेपोत करणे शक्य होईल आणि आणीबाणीच्या प्रसंगी दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होईल. तळावर देखभाल सुसज्जता मिळाल्यामुळे भारतीय हवाई दलाला आपला ताफा अधिक सज्ज  आणि गतिमान ठेवता येईल. 

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व व्यवस्थेचा उपयोग करून संरक्षण क्षेत्रात स्वदेशी अभिकल्प, विकास आणि उत्पादनाला महत्व देत आहे. हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून कमी वजनाच्या लढावू विमान उत्पादनामुळे आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीला चालना मिळेल व देशात संरक्षण उद्योग व उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल. यामध्ये एचएएलसह अभिकल्प व उत्पादन क्षेत्रात मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योगांसहित साधारण 500 भारतीय कंपन्या काम करत असतील. हा कार्यक्रम भारतीय हवाई उत्पादन परिसंस्थेला एका उत्स्फूर्त  आत्मनिर्भर परिसंस्थेत बदलण्याच्या दिशेने उत्प्रेरकाचे काम पार पाडेल.

 

Jaydevi P.S/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1688400) Visitor Counter : 316