मंत्रिमंडळ

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या दरम्यान शास्त्रीय व तांत्रिक सहयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 13 JAN 2021 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने संयुक्त अरब अमिरातीच्या नॅशनल सेंटर फॉर मेटर्लजी (NCM) व भारतातील भूपृष्ठ विज्ञान मंत्रालय (MoES) यांच्या दरम्यान शास्त्रीय व तंत्रज्ञान विषयी सहयोगाविषयीच्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून ज्ञान, माहिती तसेच हवामानासंबधी, भूपृष्ठ व सागरी सेवा यांच्याशी संबधित सेवांमधील रडार, उपग्रह, भरती गेज, भूकंप व हवामान स्थानके अशी उपकरणे यांचे आदानप्रदान केले जाईल.

  1. या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण, सल्लामसलत, हवामानविषयक माहिती सेवा, मासेमारीसाठीची  ठिकाणे तसेच विषुववृत्तीय वादळे यांच्या अनुमानासाठी डेटाचा उपयोग करणे अश्या अनेक बाबींशी संबधित अनुभवांची देवाणघेवाण तसेच शास्त्रज्ञ, संशोधन करणारे व तज्ञ यांच्या परस्पर देशांत भेटी/माहितींचे आदानप्रदान होईल.
  2. सामायिक स्वारस्य असणाऱ्या बाबी बद्दलची शास्त्रीय तसेच तांत्रिक माहितीचे आदानप्रदान.
  3. सामंजस्य करारात  नमूद केलेल्या सहकार्यक्षेत्रांमध्ये येणाऱ्या समस्या तसेच दोन्ही बाजूंना स्वारस्य असणाऱ्या बाबींमधील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने द्विपक्षीय परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, संमेलने यांचे आयोजन.
  4. दोन्ही पक्षांची परस्पर सहमती असलेली इतर सहयोगाची क्षेत्रे.
  5. सागरी विभागात परस्पर सहमतीने हवामानाचा  अंदाज घेण्यासाठी हवामान निरीक्षण नेटवर्क नियुक्त करणे.
  6. ओमानच्या उत्तरी पूर्व भागावर परिणाम करणाऱ्या ओमान समुद्रातील तसेच  भारताच्या किनारी भागांवर परिणाम करणाऱ्या अरबी समुद्रातील संभाव्य त्सुनामींचा वेध घेण्यासाठी विशेष सुनामी मॉडेल विकसित करण्याच्या दृष्टीने सहकार्य.
  7. त्सुनामींचा अंदाज वर्तवण्याच्या दृष्टीने सुनामी अर्ली वॉचिंग सेंटरसाठीत्सुनामी अंदाज वर्तवणाऱ्या विशेष मॉडेलिंग सॉफ्टवेअर सारख्या माध्यमातून सहयोग.
  8. ज्या भूगर्भातील हालचालींमुळे अरबी समुद्र वा ओमानच्या समुद्रात त्सुनामी संभवते असा भारताचा दक्षिण तसेच पश्चिम भागातील काही भूकंपमापक स्थानकांदरम्यानचा तसेच ओमानच्या पश्चिमेकडील भागातील भूगर्भहालचालींचा रियल टाइम डेटा यांचे आदानप्रदान.
  9. अरबी समुद्र वा ओमानचा समुद्र यातील त्सुनामीची शक्यता वाढवणाऱ्या भूगर्भ हालचालींच्या अभ्या क्षेत्रात परस्पर सहयोग.
  10. माहितीच्या आदानप्रदानातून धूळीची तसेच वाळूची  वादळे यांचा आगाऊ अंदाज वर्तवण्यासाठी सहकार्य.

 

U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1688297) Visitor Counter : 210