शिक्षण मंत्रालय
नवीन शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीचा केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा
Posted On:
13 JAN 2021 2:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नवीन शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
या बैठकीत मंत्रीमहोदयांनी एका कृतीदलाच्या स्थापनेची सूचना केली. हे दल नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी शिक्षण मंत्रालयाच्या उच्चशिक्षण तसेच शालेय़ शिक्षण विभागांमध्ये योग्य समन्वय राखेल जेणेकरून विद्यार्थ्याला शालेय शिक्षण ते उच्च शिक्षण हा प्रवास अधिक सुलभतेने करता येईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या वेगवान अंमलबजावणीसाठी सचीवांच्या अध्यक्षतेखाली आढावा समिती व अंमलबजावणी समितीची स्थापना करण्याची सूचना मंत्रीमहोद्यांनी केली.
आपले लक्ष्य पॅकेज संस्कृतीपासून पेटंट संस्कृतीकडे नेण्याची आवश्यकता असल्यावर पोखरीयाल यांनी भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच (NETF) व राष्ट्रीय संशोधन संस्था या धोरणाच्या यशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत त्यामुळे 2021-2022 या वर्षांमध्ये त्यांची स्थापना करण्यात येईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आता अस्तित्वात असलेले शैक्षणिक धोरण याच्यांतील सुसंगतता साधण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी सर्व संबधितांना केले. उत्तम परिणामांसाठी औद्यागिक व शैक्षणिक क्षेत्रात बंध निर्माण करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.
उच्च शिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 181 कार्यक्रम प्रस्तावित आहेत व या महत्वाच्या 181 कामांची कालमर्यादा व लक्ष्याच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीमापनासाठी डॅशबोर्डही वापरला जाणार आहे. या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून दिलेल्या कामांच्या प्रगतीचे आठवडी व मासिक आढावापत्रक (कॅलेंडर) तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे अंमलबजावणीतील प्रगती सर्व संबधितांपर्यंत पोहोचेल.
U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688243)
Visitor Counter : 300