आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात गेल्या 7 महिन्यांत कोरोनाच्या नवीन रुग्णांची सर्वात कमी नोंद; गेल्या 24 तासांत 12,584 रुग्णांची नोंद
25 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 5,000 हुन कमी
कोविडच्या यूके व्हेरिएंट प्रकारात देशात सकारात्मक आढळलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 96; आहे; गेल्या 24 तासांत त्यात अधिक रुग्णांची भर पडलेली नाही.
Posted On:
12 JAN 2021 4:28PM by PIB Mumbai
जागतिक महामारीविरूद्धच्या लढ्यात भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. दररोजच्या नवीन रुग्णसंख्येने आज नोंदविला नवा नीचांक
सुमारे सात महिन्यांनंतर गेल्या 24 तासांत देशभरात एका दिवसातील नव्या 12,584 रुग्णांची नोंद झाली. 18 जून 2020 रोजी एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 12,881 होती.
‘संपूर्ण सरकार’ आणि ‘संपूर्ण समाज’ आधारित केंद्राच्या शाश्वत, कार्यक्षम आणि साचेबद्ध धोरणामुळे, दररोजच्या नवीन रुग्ण संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे. यामुळे दैनंदिन मृत्युदरातही सातत्याने घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 167 दैनंदिन मृत्यूची नोंद झाली.
भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 2,16,558 इतकी कमी आहे. एकूण पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये सक्रिय रुग्णांचे प्रमाण 2.07% इतके कमी झाले आहे.
गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये, 5,968 ने घट झाली आहे.
राष्ट्रीय सामूहिक पाठपुरावा केल्यानंतर 25 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5,000 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.
दुसरीकडे, 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 10,000 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.
चाचणीच्या पायाभूत सुविधा वाढल्यामुळे पॉझिटिव्ह प्रकरणांचे प्रमाणही कमी झाले आहे.
भारताचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.06% आहे. 22 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा राष्ट्रीय सरासरीपेक्षा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर कमी आहे.
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1.01 कोटी (10,111,294) झाली आहे म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.49% पर्यंत पोहोचले आहे. बरे झालेले आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत वाढत आहे आणि सध्या ही संख्या 98,94,736 आहे.
गेल्या 24 तासांत 18,385 रुग्ण बरे झाले आहेत.
नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 80.50%10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
रुग्ण बरे होण्याच्या दैनंदिन संख्येत महाराष्ट्राने 4,286 इतकी सर्वाधिक नोंद केली आहे. केरळमध्ये दैनंदिन 3,922 नवीन रुग्ण बरे झाले आहेत तर छत्तीसगडमध्ये दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या 1,255 झाली.
नवीन प्रकरणांपैकी 70.08% हे सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्रित आहेत.
केरळमध्ये गेल्या 24 तासात दैनंदिन प्रकरणात सर्वाधिक 31,110 नवीन रुग्ण आढळले. काल महाराष्ट्रात 2,438 तर छत्तीसगडमध्ये 853 नवीन रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात नोंदवलेल्या 167 मृत्यू प्रकरणात दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 62.28% आहे.
महाराष्ट्रात 40 तर केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 20 आणि 16 नवीन मृत्यूची नोंद झाली.
नवीन यूके व्हेरियंट जीनोम सह आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज 96 आहे. गेल्या 24 तासांत त्यात कोणतीही भर पडली नाही.
Jaydevi P.S/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687944)
Visitor Counter : 299