भारतीय स्पर्धा आयोग
मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारा कोलंबिया एशिया हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडची 100% हिस्सेदारी संपादन करण्यास सीसीआयची मंजुरी
Posted On:
08 JAN 2021 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021
मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेज प्रायव्हेट लिमिटेडला कोलंबिया एशिया हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडची 100% हिस्सेदारी संपादन करायला भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) मान्यता दिली आहे.
मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेज प्रायव्हेट लिमिटेड (एक्क्वायरर / एमएचईपीएल) मणिपाल शैक्षणिक आणि वैद्यकीय समूहाचा एक भाग असून रूग्णालयांचे कामकाज तसेच बहुविशेष सेवा पुरवतो. किफायतशीर आणि उच्च दर्जाचा आरोग्य सेवा आराखडा विकसित करणे आणि त्याला होमकेअरपर्यंत विस्तारित करणे यावर त्यांचा भर आहे. एमएचईपीएल मलेशिया वगळता भारताबाहेर कोणत्याही व्यवसायात सहभागी नाही.
कोलंबिया एशिया हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड (लक्ष्य / सीएएचपीएल) ही एक खाजगी आरोग्य सेवा कंपनी आहे जी उच्च दर्जाची, परवडणारी, सुलभ आरोग्य सेवा पुरवते. 2005 मध्ये त्यांनी भारतात काम सुरू केले. सीएएचपीएल अकरा मल्टी-स्पेशलिटी रुग्णालये आणि एक टेलि -रेडिओलॉजी व्यवसाय चालवते. सीएएचपीएल भारताबाहेर कोणत्याही व्यवसायात सहभागी नाही. मात्र आंतरराष्ट्रीय कोलंबिया यूएस एलएलसी या आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा गटाचा एक भाग आहे, जो भारत, चीन आणि आफ्रिका मध्ये आधुनिक रुग्णालयांची साखळी चालवतो.
आयोगाचा सविस्तर आदेश लवकरच जारी केला जाईल
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687153)
Visitor Counter : 263