रेल्वे मंत्रालय

समर्पित मालवाहतूक मार्गिकेची वैशिष्ट्ये

Posted On: 07 JAN 2021 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिमी समर्पित मालवाहतूक मार्गिकेचा 306 किमी लांबीचा रेवडी- मदार मार्ग  राष्ट्राला समर्पित केला . देशाच्या विकासात यामुळे आमूलाग्र बदल घडून येईल.

रेवडी - मदार मार्गाची वैशिष्ट्ये

  • हा भाग  हरियाणा ( महेंद्रगड आणि रेवाडी जिल्ह्यात अंदाजे 79  किमी,) आणि राजस्थान (जयपूर, अजमेर, सीकर, नागौर आणि अलवर जिल्ह्यात अंदाजे 22 किमी ) मध्ये स्थित आहे  
  • पश्चिमी समर्पित मालवाहतूक मार्गिकेचा  सुमारे 40%  भाग राजस्थानात आहे
  • सुमारे 250 किमी समर्पित मालवाहतूक मार्गिका हरियाणा राज्यात आहे
  • या मार्गावर 16 प्रमुख पूल आणि viaduct (1 viaduct & 15 major bridges), 269 छोटे पूल , 4 रेल्वे उन्नत पूल22 उड्डाणपूल असून 148 लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यात आली आहेत
  • यात नव्याने बांधलेले नऊ डीएफसी स्टेशन आहेत ज्यामध्ये सहा क्रॉसिंग स्टेशन आहेत -. न्यू डबला, न्यू भागेगा, न्यू श्री माधोपूर, न्यू पाचर मलिकपूर, न्यू सकुन आणि न्यू किशनगड, तर रेवडी, न्यू अटेली आणि न्यू फुलेरा ही  अन्य तीन जंक्शन स्टेशन आहेत. 
  • जमीन वगळता सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि एस अँड टी सह कंत्राटाची एकूण किंमत  5800 कोटी रुपये आहे
  • राजस्थान व हरियाणामधील रेवडी - मानेसर, नारनौल, फुलेरा आणि किशनगड भागातील विविध उद्योगांना या मार्गाचा फायदा होईल.   
  • कठुवास येथील सीओएनसीओआरच्या कंटेनर डेपोचा अधिक चांगला उपयोग होईल.
  • गुजरातमध्ये वसलेल्या कांडला , पिपावाव, मुन्ध्रा  आणि दहेज या पश्चिम बंदरांवरून उत्तर भारतात  वेगवान वाहतूक  
  • न्यू  भाऊपूर-न्यू खुर्जा मार्गाच्या  उद्‌घाटनामुळे , डब्ल्यूडीएफसी आणि ईडीएफसी दरम्यान वेगवान वाहतूक शक्य  होईल.

या मार्गावर  डीएफसीआयएलने भारतीय रेल्वेच्या  (आयआर) मालगाड्यांची चाचणी घेतली  होती.

  • आरडीएसओच्या ट्रॅक रेकॉर्डिंग कारने 110 किमी प्रतितास वेगाने बीओएक्सएनएस वॅगनच्या ऑसीलेशन चाचण्या केल्या. या वॅगन्सची वहन क्षमता 80.15 टन आहे. भारतीय रेल्वेवर सध्या वापरल्या जाणार्‍या वॅगनंपेक्षा या वॅगनचे वजन 14% जास्त आहे. डीएफसीसीआयएल पायाभूत सुविधा या वॅगन्सच्या वहन क्षमतेचा उपयोग करण्यासाठी सज्ज आहे. सध्या भारतीय रेल्वे मालगाड्या अंदाजे 60 किमी प्रति तासाच्या वेगाने  61 -71 टन वजन वाहून नेऊ शकतात. नवीन, प्रगत वॅगन अंदाजे 100 किमी प्रतितास वेगाने 81 टनापर्यंत वजन वाहून नेऊ शकतात. नवीन वॅगन सुरक्षित आणि आधुनिक देखील आहेत.  
  • बीएलसीएस-ए आणि बीएलसीएस-बी वॅगन प्रोटोटाइपची चाचणी पूर्ण झाली आहे.ही रचना  क्षमता वापर  आणि एकसमान वितरण  आणि पॉईंट लोडिंग  वाढवेल. 
  •  सध्याच्या जास्तीत जास्त 75 किमी प्रतितास वेगाच्या तुलनेत डीएफसीसीआयएल जास्तीत जास्त 100 किमी / प्रति तासाच्या वेगाने मालगाड्या चालवणार आहे, तर मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचा सरासरी वेगही भारतीय रेल्वे मार्गावरील 26 किमी प्रति तास वरून डीएफसीवर 70 किमी प्रति तास पर्यंत वाढवण्यात येईल.

डीएफसीसीआयएलची मुख्य उद्दिष्टे

  1. सध्याच्या रेल्वेमार्गावरील कोंडी दूर करणे   
  2. मालवाहतूक करणाऱ्या  गाड्यांचा सरासरी वेग 25 किमी प्रति तास वरून  70 किमी प्रति तास पर्यंत वाढवणे   
  3. हेवी हॉल रेल्वेगाड्या चालवणे (  25/32.5 टन सर्वाधिक एक्सेल भार )आणि एकूण  भार  13,000 टन
  4. लांब (1.5km) आणि डबल स्टॅक कंटेनर गाड्या चालवणे
  5. वेगवान मालवाहतुकीसाठी सध्याची बंदरे आणि औद्योगिक परिसरांना जोडणे 
  6. जागतिक मानकांनुसार ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरण -स्नेही वाहतूक प्रणाली 
  7. रेल्वेचा हिस्सा सध्याच्या 30%  वरून  45%.पर्यंत वाढवणे
  8. वाहतुकीचा खर्च कमी करणे

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686962) Visitor Counter : 235