आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 संदर्भात ताजी माहिती
केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालला पत्र लिहिले
कोविड रुग्णांमध्ये अलिकडच्या काळातली वाढ रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे आणि अधिक दक्ष राहण्याचे राज्यांना केले आवाहन
आतापर्यंतच्या कामगिरीवर पाणी फिरेल अशा कोणत्याही शिथिलतेविरूद्ध सतर्क राहण्याची राज्यांना केली सूचना
Posted On:
07 JAN 2021 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021
केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल यांना पत्र लिहिले असून कोविड 19 रुग्णांच्या वाढीला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. अलिकडच्या दिवसांमध्ये या राज्यांमध्ये दररोज आढळणाऱ्या कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदली गेली आहे.
राज्यांना 'काटेकोरपणे दक्षता' पाळण्याचा आणि विशेषत: काही देशांमध्ये विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची सूचना केली आहे. राज्यांमधील चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याकडे आरोग्य सचिवांनी राज्यांचे लक्ष वेधले आणि या निर्णायक काळात कोणताही हलगर्जीपणा आपल्या सामूहिक कृतीचे प्रयत्न हाणून पाडू शकतो असे स्पष्ट केले. या वाढीमागील कारणे समजून घेण्यासाठी जिल्हा व उपजिल्हा स्तरावर वाढीचे विश्लेषण करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे आणि वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासाठी सक्रियपणे उपाययोजना करायला सांगितले आहे. देशाने अवलंबलेली “टेस्ट-ट्रॅक-ट्रीट” रणनीती अधिक आक्रमकपणे अंमलात आणण्याची सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी केली. लसीकरण मोहीम सुरू होणार असताना राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी मास्कचा वापर आणि इतर कोविड संबंधी सूचनांचे पालन करावे अशी सूचनाही केली आहे. कोविड19, नियंत्रण व व्यवस्थापनात सामूहिक प्रयत्नांमध्ये आत्मसंतुष्ट राहू नये याचा आरोग्य सचिवांनी पुनरुच्चार केला.
महामारी हाताळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाला सर्व आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन राज्यांना देण्यात आले .
देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 59% रुग्ण या चार राज्यांमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील कोविड बाधितांची एकूण संख्या 19,54,553 आहे जी राष्ट्रीय आकडेवारीच्या 18.80% आहे. राज्यात 18,52,759 रूग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 94.79%.आहे. राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 51,969 ( राष्ट्रीय आकडेवारीच्या 22.79% ) आहे. राज्यात एकूण 49,825 मृत्यूची नोंद झाली असून मृत्युदर 2.55% आहे. गेल्या सात दिवसांत महाराष्ट्रातील रुग्णांची सरासरी 3,707 असून गेल्या 7 दिवसांत मृत्यूची सरासरी संख्या 51 आहे. सकारात्मक रुग्ण आढळण्याचा दर 15.43% आहे.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686927)
Visitor Counter : 248