कृषी मंत्रालय

खरीप विपणन हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमतीवरील खरेदी


धान खरेदीत गतवर्षीच्या तुलनेत 27.13% ने वाढ दिसून आली

एकूण 98456.80 कोटी रुपयांच्या आधारभूत किंमतीवरील खरेदीचा साधारणतः 67.89 लाख तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना लाभ

प्रविष्टि तिथि: 07 JAN 2021 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021

 

सध्या सुरू झालेल्या खरीप विपणन हंगाम (KMS) 2020-21, मध्ये सरकारने अस्तित्वात असलेल्या किमान आधारभूत किंमत योजनांनुसार शेतकऱ्यांकडून खरीप पिकांची खरेदी सुरू ठेवली आहे.

खरीप विपणन हंगाम (KMS) 2020-21 मधील धान(तांदूळ) खरेदी, तांदूळ उत्पादक राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये  सुरळीत सुरू आहे.  पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदीगढ़, जम्मू-काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़, ओदिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, आसाम, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 06.01.2021 पर्यंत 521.48 लाख मेट्रीक टन धान खरेदी करण्यात आले. गतवर्षी याच काळात 410.18 लाख मेट्रीक टन धान खरेदी झाली होती. गतवर्षीपेक्षा यावर्षी धान खरेदीत  27.13% नी वाढ झाली. एकूण 521.48 LMT धान खरेदीपैकी फक्त पंजाबमध्ये 202.77 लाख मेट्रीक टन धान खरेदी केले गेले. हे प्रमाण देशातील एकूण खरेदीच्या 38.88% आहे.

चालू खरीप विपणन हंगामातील किमान आधारभूत किमतीवरील एकूण 98456.80  कोटी रुपयांच्या खरेदीचा लाभ याआधीच 67.89 लाख शेतकऱ्यांना झाला आहे.

याशिवाय, राज्यांकडून मिळालेल्या प्रस्तावाच्या आधारे मूल्य समर्थन योजनेंतर्गत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, ओदिशा, राजस्थान व आंध्र प्रदेश या राज्यांसाठी मूल्य समर्थन योजनेंतर्गत (PSS) खरीप विपणन हंगाम 2020 मध्ये  51.66 लाख मेट्रिक टन डाळी व तेलबियाच्या खरेदीला मान्यता देण्यात आली.

06.01.2021 पर्यंत सरकारने आपल्या नोडल एजन्सीमार्फत 278059.62 मे.टन मूग ,उडीद, भुईमूग शेंगा आणि  सोयाबिनची किमान आधारभूत किंमतीने 1487.65 कोटी रुपये मूल्याची खरेदी केली असून तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजराथ, हरियाणा आणि राजस्थानमधील 148555 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.

खोबरे व उडीद यांचे दर यांच्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये किमान आधारभूत किमतीहून जास्त आहेत. खरीप डाळी व तेलबियांच्या आवकानुसार संबंधित राज्यांनी ठरविलेल्या तारखेपासून  संबंधित राज्य/ केंद्रशासित प्रदेश सरकार  खरेदी सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करत आहेत.

पंजाब, हरियाणा, राजस्थान मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओदिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये किमान आधारभूत किमतीने कापूस खरेदी सुरळीत सुरू आहे. 06.01.2021 पर्यंत 23485.05 कोटी रुपये किमतीच्या 8026401 कापसाच्या गासड्या खरेदी झाल्या असून त्याचा लाभ 1559429 शेतकऱ्यांना झाला.

 

S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1686894) आगंतुक पटल : 149
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil