गृह मंत्रालय

जम्मू आणि काश्मीरच्या औद्योगिक विकासासाठी असलेल्या केंद्रीय क्षेत्र योजनेला आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने दिलेल्या मंजुरीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले स्वागत

Posted On: 07 JAN 2021 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021

जम्मू आणि काश्मीरच्या औद्योगिक विकासासाठी असलेल्या केंद्रीय क्षेत्र योजनेला आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने दिलेल्या मंजुरीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरची दहशतवाद आणि फुटीरतावादापासून मुक्तता करून तेथे विकास सुरु केला आहे असे अमित शहा यांनी  ट्वीट संदेशात म्हटले आहे. जम्मू-काश्मीरच्या औद्योगिक विकासासाठी 28,400 कोटी रुपयांच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली  मंजुरी ही  मोदीजींच्या हृदयातले  जम्मू काश्मीरचे विशेष स्थान दर्शविते असे ते म्हणाले.

 हे मोदीजींचे दूरदर्शी नेतृत्व असून, परिणामी, प्रथमच औद्योगिक विकास हा तालुका स्तरावर पोहोचला आहे असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल आणि तालुका स्तरापर्यंत रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा होईल. यासाठी मी नरेंद्र मोदी जी यांचे अभिनंदन करतो असे अमित शहा म्हणाले.

अमित शहा म्हणाले, ही योजना जम्मू-काश्मीरच्या कुटीर उद्योग, हस्तकला, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वरदान ठरेल. यामुळे उत्पादन व सेवा क्षेत्रात नवीन एमएसएमई उद्योग सुरु करायला तसेच विद्यमान उद्योगांच्या विस्तारास चालना मिळेल.

ही योजना जम्मू-काश्मीरमध्ये समृद्धीची पहाट घेऊन येईल . ती  अभूतपूर्व गुंतवणूक आकर्षित करेल आणि सुमारे साडेचार लाख लोकांना रोजगार पुरवेल.  यामुळे युवकांमध्ये कौशल्य विकास होईल आणि विद्यमान उद्योगांना बळकटी मिळेल, जेणेकरून जम्मू-काश्मीर देशातील इतर क्षेत्रांइतके सक्षम होईल" असेही त्यांनी सांगितले.

 

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1686873) Visitor Counter : 110