विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारताला जगातील पहिल्या तीन वैज्ञानिक महासत्तांमध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टीने 5व्या राष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन धोरणाचा मसुदा तयार करताना आत्मनिर्भरतेच्या दूरदृष्टीचे मार्गदर्शन

Posted On: 06 JAN 2021 8:22PM by PIB Mumbai

 

सर्वसमावेशक आणि सर्व सहभागींना समानतेने लाभकारक ठरणारी, व्यापक विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन परीसंस्थेची निर्मिती हा एसटीआयपी अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन धोरणाचा मसुदा तयार करण्याचा मुख्य उद्देश आहे असे उद्गार विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी काढले. एसटीआयपीच्या मसुद्याबाबत माध्यम प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. काळ बदलतो आहे आणि आपले भविष्य अतिवेगाने आपल्या दिशेने येत आहे. बदलाच्या या वेगासाठी आपल्याला तयार ठेवायला हे धोरण मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

IMG20210106123239

भारताला शाश्वत विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करण्यासाठी, आर्थिक विकास आणि सामाजिक अंतर्भाव तसेच आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक पर्यावरणीय शाश्वतता मिळविण्यासाठी पारंपरिक ज्ञान प्रणालीला प्रोत्साहन, स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि अगदी मुळापासूनच्या संशोधनाला प्रोत्साहन यावर भर देणे आवश्यक आहे. विनाशक आणि चुकीचे परिणाम घडविणाऱ्या तंत्रज्ञानाचा उदय हे नवे आव्हान आहे तसेच ती एक मोठी संधी देखील आहे असे ते म्हणाले.

5 व्या राष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन धोरणाचा मसुदा निश्चित करण्यात आला असून जनतेच्या सूचनांसाठी उपलब्ध आहे. भारताला तंत्रज्ञानविषयक आत्मनिर्भरता मिळविण्यासाठीच्या विशाल दूरदृष्टीच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून हा मसुदा तयार केला आहे आणि देशाला जगातील ह्या दशकातील पहिल्या तीन वैज्ञानिक महासत्तांमध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टीने जनतेला आवाहन, आकर्षित, संगोपन, सक्षम करून लोक-केंद्री विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनव शोधांद्वारे महत्त्वाचे मानवी भांडवल जपून ठेवणे हा त्याचा उद्देश आहे.

धोरणात सुचविण्यात आलेली राष्ट्रीय एसटीआय निरीक्षणयंत्रणा, एसटीआय परीसंस्थेने निर्माण केलेल्या आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारच्या माहितीचे मध्यवर्ती भांडार म्हणून काम करेल.

मुख्य शिफारसींचा तपशील वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जनतेच्या सूचनांसाठी हा मसुदा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

धोरणाच्या मसुद्यावरील सूचना, टिप्पण्या आणि सल्ले, सोमवार 25 जानेवारीपर्यंत india-stip[at]gmail[dot]com. वर ईमेल द्वारे पाठविता येतील. धोरणाचा मसुदा https://dst.gov.in/draft-5th-national-science-technology-and-innovation-policy-public-consultation येथे उपलब्ध आहे.

****

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686638) Visitor Counter : 206