रेल्वे मंत्रालय
डेडीगेटेड फ्रेट कॉरीडॉर मधल्या पूर्व आणि पश्चिम कॉरिडॉरवरच्या पूर्णत्वाकडे जाणाऱ्या विविध विभागांच्या प्रगतीचा रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी घेतला आढावा
Posted On:
04 JAN 2021 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021
डेडीगेटेड फ्रेट कॉरीडॉर मधल्या पूर्व आणि पश्चिम कॉरिडॉरवरच्या पूर्णत्वाकडे जाणाऱ्या विविध विभागांच्या प्रगतीचा रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज आढावा घेतला. पूर्ण प्रकल्पाचे जून 2022 पर्यंत राष्ट्रार्पण सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. काही विभागात नियोजित वेळापत्रकापणे काम करण्यात रेल्वेला येणाऱ्या आव्हानांबाबत त्यांना माहिती देण्यात आली. प्रकल्प वेळेनुसार जून 2022 पर्यंत पूर्ण व्हावा या दृष्टीने सर्व संबंधितांना एकत्र आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मालवाहू रेल्वेच्या वेगवान वाहतुकीसाठी भारतीय रेल्वे डेडीगेटेड फ्रेट कॉरीडॉर अर्थात समर्पित मालवाहतूक मार्गिका तयार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29.12.2020 ला पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिकेवरच्या 351 किमीच्या न्यू खुर्जा-न्यू भाऊपुर टप्याचे उदघाटन केले. पहिल्या टप्यात डीएफसीसीआयएल, 1504 किमीचा पश्चिम डीएफसीआणि पूर्व डीएफसी (1856 किमीचा मार्ग, पीपीई विभागाच्या सोननगर-दानकुनी विभागासह) बांधत आहे. पूर्व डीएफसी पंजाबमधल्या लुधियानाजवळच्या सहनीवाल इथून सुरू होऊन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधून पश्चिम बंगाल मधल्या दानकुनी पर्यंत जातो. उत्तर प्रदेशातल्या दादरी ते मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) याना जोडणारा पश्चिम कॉरिडॉर उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जातो. पश्चिम डीएफसी आणि पूर्व डीएफसी (सोननगर-दानकुनी पीपीई विभाग वगळता) 2800 किमीचा मार्ग जुन 2022 मध्ये सुरू करण्यात येईल.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686216)
Visitor Counter : 158