वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतीय मालाच्या व्यापाराची डिसेंबर 2020 मधील प्राथमिक माहिती


मालाच्या निर्यातीमध्ये अंशतः घट ; डिसेंबर 2019 च्या तुलनेत यंदा आयातीमध्ये 7.6 टक्के वाढ

Posted On: 02 JAN 2021 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2021


भारताने डिसेंबर 2020 मध्ये 26.89 अब्ज डॉलर्सची निर्यात केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत देशाच्या निर्यातीमध्ये अगदी किरकोळ- अंशतः घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी  म्हणजे डिसेंबर 2019 मध्ये भारताने 27.11 अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. निर्यातीत यंदा 0.80 टक्के घट झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2020 -21 या काळात 200.25 डॉलर्सची निर्यात करण्यात आली. त्याआधीच्या वर्षात म्हणजे 2019-20 एप्रिल ते डिसेंबर या काळात 238.27 टक्के निर्यात झाली होती. यामध्ये नकारात्मक वृद्धी 15.8 टक्के झाली.

डिसेंबर 2020 मध्ये भारताने 42.60 अब्ज डॉलर्सचा माल आयात केला. गेल्यावर्षी, 2019 डिसेंबरमध्ये भारताने 39.59 अब्ज डॉलर्सचा माल आयात केला होता. देशाच्या आयातीमध्ये 7.6 टक्के वाढ झाली आहे. तसेच एप्रिल-डिसेंबर 2020-21 याकाळात 258.29 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली. गेल्यावर्षी याच काळात 364.18 अब्ज डॉलर्सचा माल आयात केला. यामध्ये नकारात्मक वृद्धी 29.08 टक्के झाली.

डिसेंबर 2020 मध्ये निव्वळ व्यापारी तूट 15.71 अब्ज डॉलरची दर्शविते. गेल्यावर्षी ही तूट 12.49 अब्ज इतकी होती. ही तूट 25.78 टक्क्यांनी वाढली आहे.

डिसेंबर 2020 मध्ये बिगर पेट्रोलियम वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य 24.74 अब्ज डॉलर नोंदवले गेले आहे. यामध्ये डिसेंबर 2019 च्या तुलनेत 5.33 टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्न-आभूषणांची डिसेंबर 2020 मध्ये 22.15 अब्ज डॉलरची निर्यात झाली. गेल्यावर्षी - डिसेंबर 2019 मध्ये या वस्तूंची 21.06 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. यामध्ये 5.17 टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.

डिसेंबर 2020 मध्ये तेल आयात 9.61 अब्ज डॉलरची करण्यात आली. गेल्यावर्षी डिसेंबर 2019 मध्ये 10.72 अब्ज डॉलर तेल आयातीवर खर्च करण्यात आले होते. या आयातीमध्ये 10.37 टक्के घट झाली आहे.

डिसेंबर 2020 मध्ये बिगर तेल आयातीसाठी 33.0 अब्ज डॉलर खर्च होईल, असा अंदाज होता. गेल्यावर्षी यासाठी 28.88 अब्ज डॉलर खर्च झाले होते. त्यामध्ये 14.27 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

डिसेंबर 2020 मध्ये बिगर- तेल, बिगर- रत्ने आणि आभूषण (सोन, चांदी आणि मौल्यवान धातू) यांची आयात 26.10 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. डिसेंबर 2019 मध्ये या वस्तूंची 24.07 अब्ज डॉलरची आयात झाली. यामध्ये सकारात्मक वाढ 8.42 टक्के नोंदवली आहे.

* * *

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1685691) Visitor Counter : 211