पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने केल्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रदेश प्रदुषण मंडळ व संबधित संस्थांना हवाप्रदुषणाला आळा घालण्यासाठी त्वरित व परिणामकारक उपाय योजण्याच्या सूचना

Posted On: 31 DEC 2020 7:50PM by PIB Mumbai

 

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ (CPCB)  दिल्ली राजधानी क्षेत्रातील सुधारित हवेचा दर्जा आणि हवामान  परिस्थिती यांची सातत्याने पाहणी करते. भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या अंदाजानुसार  दिल्लीत वायुविजनाची स्थिती सातत्याने धिमी होत आहे, ज्यामुळे प्रदुषित कण विखरण्याचे प्रमाणही कमी होऊन  हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा येत्या काही दिवसांमध्ये अतिशय कमी राहिल.

सातत्याने घटणारी हवेची गुणवत्ता व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी केले जाणारे सोहळे यामुळे केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने 23.12.2020 रोजी  दिल्ली प्रदुषण नियंत्रण समिती (DPCC) व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील म्हणजे हरयाणा, उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यांची विशेष प्रदुषण नियंत्रण मंडळे यांना उद्देशुन आदेश काढला. त्यात खालील उपाययोजनांची खातरजमा करण्याचे निर्देश आहेत.

  • 02 जानेवारी 2021 पर्यंत हॉट मिक्स प्लॅन्ट्स व  दगड फोडण्याची यंत्रे पूर्णवेळ बंद राहतील.
  • रस्त्यांची  यंत्राद्वारे केली जाणारी सफाई व त्यावर पाणी फवारणी यांची वारंवारता वाढवावी. विशेषतः ज्या रस्त्यांवर जास्त प्रमाणावर धूळ जमते त्या रस्त्यांवर याची अंमलबजावणी व्हावी.
  • बांधकाम होत असलेल्या ठिकाणी देण्यात आलेल्या सूचना व प्रमाणित  कार्य प्रणाली(SOP) चे कटाक्षाने पालन करावे.
  • माननिय न्यायालये व राष्ट्रीय हरित प्राधिकरणांनी फटाक्यांच्या विक्री तसेच वापरासंबधी प्रसृत केलेल्या आदेशांचे पालन करण्याकडे संस्थांनी कटाक्षाने लक्ष पुरवावे.
  • उत्कर्ष पनवार विरुद्ध केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्यामधील दाव्यावर माननिय राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने 15 ऑक्टोबर 2019 रोजी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सर्व वीटभटट्या याआधीच बंद करण्यात आल्या आहेत,
  • केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने फिल्ड तपासणीसाठी 50 पथके तैनात केली आहेत.

***

G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor

 

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1685169) Visitor Counter : 216