अर्थ मंत्रालय

आर्थिक वर्ष 2020-21 साठी केंद्र सरकारच्या विभागांच्या नोव्हेंबर 2020 पर्यंतच्या मासिक उलाढालीचा एकत्रित अहवाल

Posted On: 31 DEC 2020 6:45PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या विभागांची नोव्हेंबर 2020 पर्यंतची मासिक उलाढाल एकत्रित करून अहवान प्रकाशित केला आहे. यातील प्रमुख बाबी खालीलप्रमाणे:-

केंद्र सरकारला नोव्हेंबर, 2020 पर्यंत रु 8,30,851 कोटी (संबधित अंदाजपत्रकानुसार 2020-21च्या एकूण प्राप्तीच्या 37% ) प्राप्त झाले. यामध्ये रु 6,88,430 कोटी  हे कर महसूल (Net to Centre) रु 1,24,280 कोटी कर महसूलेतर  व  रु 18,141 कोटींच्या कर्जाविना भांडवली उत्पन्न  समाविष्ट आहे. विनाकर्ज भांडवली उत्पन्नात कर्ज वसूली (रु 11,962 कोटी) व निर्गुंतवणूक निधी (रु 6,179 कोटी) यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने नोव्हेंबर 2020 पर्यंत जमा केलेल्या सामायिक करांच्या विभाजनामधील राज्यांचा वाटा म्हणून रु 3,34,407 कोटी  राज्य सरकारांकडे वर्ग करण्यात आले.

केंद्र सरकारचा एकूण खर्च रु 19,06,358 कोटी ( 2020-21 साठीच्या संबधित अंदाजपत्रकाच्या 63%), ज्यापैकी रु 16,65,200 कोटी हे महसूली खात्यावरील तर रुपये 2,41,158 कोटी भांडवली खात्यावरील आहेत. एकूण महसूली खर्चापैकी रु 3,83,425 कोटी ही रक्कम व्याज चुकते करण्यासाठी तर  रु 2,02,119 कोटी ही रक्कम  विविध अनुदानांसाठीची आहे.

 

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685136) Visitor Counter : 137


Read this release in: English , Urdu , Punjabi