पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

वायू गुणवत्ता आयोगाकडून  दिल्लीतल्या 13 पथकर नाक्यांवर आरएफआयडी प्रणालीची कठोरतेने अंमलबजावणी करण्याची मागणी

Posted On: 29 DEC 2020 6:36PM by PIB Mumbai

 

दिल्लीत येणा-या व्यावसायिक वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी 13 पथकर नाक्यांवर आरएफआयडी म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन यंत्रणा बसविण्यात आली आहे. या पथकर नाक्यांवरून दिल्लीमध्ये जवळपास 70 टक्के व्यावसायिक वाहने प्रवेश करतात.

दिल्ली एनसीआर आणि या परिसरातल्या भागांमध्ये वायू गुणवत्तेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात नाही, असे वायू गुणवत्ता आयोगाच्या निर्दशनास आले आहे. तसेच पथकर नाक्यांवर असलेली यंत्रणाही पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेली नाही. वाहनांवर आरएफआयडीचा टॅग नसला तरी व्यावसायिक वाहनांना दिल्लीमध्ये प्रवेश दिला जात आहे. तसेच वाहनांवर लावलेल्या टॅगच्या खात्यात पुरेसा निधी नसला तरीही वाहनांना प्रवेश दिला जात आहे.

दिल्लीमध्ये हवेतले प्रदूषण अतिशय जास्त आहे. व्यावसायिक वाहने या प्रदूषणात अधिक भर घालतात, हे लक्षात घेऊन, दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने दि. 1 जानेवारी, 2021 पासून आरएफआयडीच्या नियमांचे कठोरतेने पालन करण्याची सूचना केली आहे. आरएफआयडी टॅग नसलेल्या वाहनांना अथवा टॅगमध्ये पुरेशी शिल्लक नसलेल्या वाहनांना दिल्लीत प्रवेश नाकारण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

दिल्लीत येणा-या व्यावसायिक वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी यासंबंधी आधीच सूचना देऊन त्याचा प्रचार करण्याचे निर्देशही दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने दिले आहेत.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684430) Visitor Counter : 148