आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशाची पहिली न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस विकसित;  डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 28 DEC 2020 9:16PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन  यांनी आज देशाच्या पहिल्या न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लसीचे उद्घाटन केले. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने बिल अँड मिलिंडा गेट्स फौंडेशन यासारख्या भागीदारांसमवेत ही लस विकसित केली आहे.

उत्पादन संख्या लक्षात घेता सिरम ही जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असल्याचा उल्लेख करत  भारताच्या  अर्थव्यवस्थेतल्या कंपनीच्या योगदानाची दखल डॉ हर्ष वर्धन यांनी घेतली. सिरमच्या लसी 170 देशात वापरल्या जातात असे सांगून जगातल्या  प्रत्येक तिसऱ्या मुलाचे लसीकरण  या कंपनीच्या  लसीने केले जाते असे त्यांनी नमूद केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  आत्मनिर्भर भारत दृष्टिकोन अनुसरत  सिरमने न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस (पीसीव्ही) विकसित करून कोविड-19 महामारीच्या लॉकडाऊन काळात पहिल्या स्वदेशी न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लसिसाठी केंद्र सरकारकडून परवाना घेतल्याचे स्मरण त्यांनी उपस्थिताना करून दिले.

पीसीव्ही मध्ये भारत स्वयंपूर्ण होण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विशेष प्रयत्नांचा उल्लेखही त्यांनी केला.

भारताच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यासाठी सिरमने केलेल्या   कामगिरीचा तपशील देतानाच सिरमची पहिली  स्वदेशी  न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस बाजारात न्युमोसील  या  ब्रांड खाली माफक दरात उपलब्ध होईल.

5 यादृच्छिक नियंत्रित वैद्यकीय चाचण्यांद्वारे न्युमोसीलचे मुल्यांकन करण्यात आले असून भारत आणि आफ्रिकेतल्या लोकांमध्ये परवानाप्राप्त लसीच्या तुलनेत  ते सुरक्षित आढळले आहे.  न्युमोनियाचा  संसर्ग जगभरात पाच वर्षाखालच्या 10 लाख बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो.

पूनावाला समूहाचे अध्यक्ष आणि सिरमचे संस्थापक डॉ सायरस पूनावाला,सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यावेळी उपस्थित होते.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684230) Visitor Counter : 294