पर्यटन मंत्रालय

भारतीय पर्यटन-मुंबई आपल्या सात दिवसांच्या अनोख्या ब्रँड ऍक्टिव्हेशन इव्हेंटने शॉपिंग मॉलला भेट देणाऱ्या सर्वांना करत आहे मंत्रमुग्ध


एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत, 'अतुलनीय भारत' या योजनेत ओदिशा राज्यासमवेत महाराष्ट्राच्या पर्यटन क्षमतेचे दर्शन

Posted On: 27 DEC 2020 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2020

 

पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक कार्यालय, भारत पर्यटन मुंबई यांनी मुंबईतील रिलायन्स माॅल बोरीवली येथे दिनांक 25 डिसेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान 'एक्सप्लोअर इनक्रेडिबल इंडिया' या संकल्पनेवर आधारीत 'देखो अपना देश 'या स्वदेशी पर्यटन विपणन मोहिमेचा आरंभ केला आहे.

भारतातील अनेक पर्यटनस्थळे नुकतीच पुन्हा सुरू होत आहेत, अशा वेळी स्वदेशी प्रवाशांना आकर्षित करून त्यांना त्यांच्या आगामी सुटीच्या आणि साप्ताहिक अखेरीच्या कालावधीसाठी  आवडीचे पर्यटनस्थळ निवडण्यासाठी सर्व वयोगटातील अभ्यागतांना, विशेष प्रचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रवासाची माहिती आणि स्थानिक प्रवासी संस्थांनी तयार केलेल्या विशेष पॅकेजेसची माहिती बोरीवली मुंबई येथील टूर चालकांसह उपलब्ध करण्यात येत आहे.   

सात दिवस चालणाऱ्या या उपक्रमाची रचना मुंबईच्या आसपासच्या भागातील ड्रायव्हिंग हाॅलिडेज, मुंबई जवळील सप्ताहा अंती सहलीसाठी भेट देता येण्यासारखी ठिकाणी जाण्यासाठी आणि आकर्षक वातावरण निर्मितीच्या दृष्टीने केली आहे.

बोरीवलीतील रिलायन्स माॅलमधे मधे भारत सरकारच्या "एक भारत श्रेष्ठ भारत" या अंतर्गत 'अतुलनीय भारत' या प्रदर्शना मधे  महाराष्ट्रासोबत ओदिशाची जोडी जमवून  तेथील पर्यटन क्षमतेचेही  दर्शन घडविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सावंतवाडी येथील खेळणी आणि वारली चित्रांचेही दर्शन घडविण्यात येत आहे. ही खेळणी आणि चित्रकलेच्या महाराष्ट्राच्या कलात्मकतेचे प्रतिनिधीत्व करतात. ती या राज्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कलाकुसरीच्या संस्कृतीचेही दर्शन घडवितात.  

* * *

G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684026) Visitor Counter : 149