उपराष्ट्रपती कार्यालय

सार्वजनिक जीवनातील मुल्यांच्या ऱ्हासाबाबत उपराष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली

Posted On: 26 DEC 2020 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2020

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सार्वजनिक जीवनातील मूल्यांचा जो ऱ्हास होत आहे त्याबद्दल चिंता व्यक्त केली तसेच सार्वजनिक यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी आणि स्वच्छ राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्वरित व सामूहिक कारवाई केली नाही तर लोकांचा राजकीय व्यक्तींवर विश्वास राहणार नाही,अशी चेतावणी दिली.

हैदराबाद येथे आज इंडिया फाउंडेशनतर्फे आयोजित तिसऱ्या अटलबिहारी वाजपेयी स्मारक व्याख्यानमालेला संबोधित करताना नायडू यांनी सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांसह सर्व सदस्यांचे प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी नीतिनियमांना धरून आचरण असेल हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही सर्व राजकीय पक्षांची असल्याचे जोर देऊन सांगितले.  तसेच, चर्चेचा स्तर वाढविणे, बेलगाम वागणे टाळावे आणि 3 डी (डिस्कस,डीबेट आणि डीसाइड) चे पालन करावे - चर्चा, वादविवाद आणि निर्णय घेणे आणि आमदारांना चौथा डी – (डीस्रप्ट) अडथळा बनणे टाळण्याचे आवाहन केले.

“लोकशाहीवादी मतैक्य निर्माण करणे-वाजपेयींच्या पद्धतीने” या यावर्षीच्या व्याख्यानमालेच्या संकल्पने विषयी नायडू म्हणाले की, अटल जी यांच्यासाठी 'मतैक्य' हे केवळ एक उपयुक्त राजकीय साधन नव्हते, तर त्यांच्या बांधिलकीचा तो महत्त्वाचा घटक होता. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करताना उपराष्ट्रपतींनी त्यांना भारत आणि जगभरातील सर्वात सन्मानित आणि प्रशंसीत पंतप्रधान म्हणून संबोधले.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास' या मंत्राचा उल्लेख करताना उपराष्ट्रपतींनी यात सर्वसमावेशक व लोकशाही कारभाराची भावना आणि अटलजींचा वारसा पुढे चालू ठेवण्याची प्रतिबद्धता असल्याचे म्हटले.

या कार्यक्रमाला किशन रेड्डी, केंद्रीय गृहव्यवहार राज्यमंत्री, व्हाईस एडमिरल शेखर सिन्हा, सदस्य, विश्वस्त मंडळ, इंडिया फाउंडेशन, राम माधव, सदस्य, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, इंडिया फाउंडेशन आणि  शौर्य डोभाल, सदस्य, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अशा उच्चपदस्थ व्यक्ती उपस्थित होत्या.

 

उपराष्ट्रपतींच्या भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1683916) Visitor Counter : 223