राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 25 ते 28 डिसेंबर दरम्यान दीवच्या दौऱ्यावर

Posted On: 24 DEC 2020 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2020

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2020 दरम्यान दीव येथे भेट देणार आहेत.

25 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रपती दीव येथील जालंधर सर्किट हाऊसचे उद्घाटन करतील. 26 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रपती दीवमधील विविध विकासकामांचे उद्घाटन/ भूमीपूजन करतील. यामध्ये दीवमधील आयआयआयटी वडोदरा- इंटरनॅशनल कॅम्पस आणि कमलेश्वर स्कूल घोघलाच्या पहिल्या शैक्षणिक सत्राचे उद्घाटन, सौदवाडी येथील शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन, दीव सिटी वॉलवरील 1.3 किमीच्या हेरिटेज वॉकची सुधारणा, ऐतिहासिक वारशाच्या वास्तूंच्या (झॅम्पा आणि बाजारपेठेचे संरक्षक भाग) संरक्षक तटबंदीचे आणि दर्शनी भागाचे नूतनीकरण, फोर्ट रोड येथील फळे आणि भाजीपाला बाजाराचे अद्ययावतीकरण आणि दीव जिल्ह्यातील संपूर्ण शहरी आणि ग्रामीण भागासाठी महानगरपालिकेच्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणालीचा विकास यांचा समावेश आहे. याच दिवशी ते आयएनएस खुकरी या स्मारकाचे देखील उद्घाटन करतील. 27 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रपती दीवच्या किल्ल्याला भेट देतील आणि तिथल्या ध्वनी आणि प्रकाश योजनेवर आधारीत कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. 28 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रपती नवी दिल्लीला परत येतील.

 

* * *

S.Thakur/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1683390) Visitor Counter : 135