उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्याकडून देशाला ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा

Posted On: 24 DEC 2020 5:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2020


उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला देशाला शुभेच्छा दिल्या आहेत.  

“या ख्रिसमसच्या शुभदिनी माझ्या आपणा सर्व नागरिकांना हार्दीक शुभेच्छा.

ख्रिसमस हा भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिनाचा सोहळा आहे. हा सण मानवतेच्या उद्धारासाठी भगवान येशूने शिकवलेल्या करुणा आणि क्षमाशीलता या मूल्यावरील आपला विश्वास दृढ करतो.

ख्रिसमस हा कुटुंबीय आणि मित्रमैत्रीणीं या सर्वांनी एकत्र येत उत्साहाने साजरा करण्याचा सोहळा आहे. पण कोविड-19 च्या वाढत्या प्रकोपामुळे यावर्षी, आपल्याला तो साधेपणाने साजरा करावा लागत आहे.

जगातील सर्वांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी आपण प्रार्थना करूया. हा सण आपल्या जीवनात शांतता, ऐक्य, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो.”

 


* * *

S.Thakur/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1683340) Visitor Counter : 90