पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
देशातल्या बिबट्यांच्या संख्येत 60 टक्के वाढ, भारतात आता 12,852 बिबटे
वाघ, सिंह आणि बिबट्यांची वाढती संख्या म्हणजे वन्य जीव आणि वस्तीस्थाने बहरत असल्याचे द्योतक -प्रकाश जावडेकर
Posted On:
21 DEC 2020 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2020
गेल्या काही वर्षात देशात, वाघ, सिंह आणि बिबट्यांची वाढती संख्या म्हणजे पर्यावरण जतनासाठीच्या प्रयत्नांचे आणि वन्य जीवन आणि जैव विविधता बहरत असल्याचे द्योतक आहे, असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. नवी दिल्लीत बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल प्रकाशित करताना ते आज बोलत होते.
भारतात आता 12,852 बिबटे असून 2014 मधे केलेल्या सर्वेक्षणात ही संख्या 7910 होती. बिबट्यांची 60 % पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 3,421, 1,783 आणि 1,690 बिबट्यांची संख्या अनुमानित आहे.
भारतात वाघांसंदर्भात देखरेख ठेवताना परिसंस्थेतल्या वाघांची महत्वाची भूमिका स्पष्ट झाली, त्यातूनच बिबट्या सारख्या इतर करिश्माई प्रजातींवर प्रकाश पडल्याचे मंत्री म्हणाले.
संरक्षित आणि बहु उपयोगी जंगलात हे वाघ आणि बिबट्या आढळतात. बिबट्यांच्या 51,337 छायाचित्रात एकूण 5,240 प्रौढ बिबटे आढळले आहेत.
बिबट्यांची वस्तीस्थाने असणाऱ्या देशातल्या जंगलातल्या वाघांची गणना झाली मात्र बिगर वन क्षेत्रातली (चहा आणि कॉफीचे मळे जिथे बिबट्याचा वावर मानला जातो) हिमालयावरची उंच स्थाने, ईशान्येकडचा भाग लक्षात घेण्यात आलेला नाही म्हणूनच बिबट्यांची ही संख्या किमान मानली जावी.
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण- भारतीय वन्यजीव संस्था इतर विविध प्रजातीबाबत लवकरच अहवाल जारी करणार आहे.
संपूर्ण अहवाल
* * *
S.Thakur/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682499)
Visitor Counter : 326