ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
किमान हमी भावाच्या व्यवहारात 11.2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडून सुमारे 17,000 कोटी रुपयांच्या कापसाच्या गाठी खरेदी केल्या
Posted On:
20 DEC 2020 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2020
खरीप हंगाम 2020 – 21 साठी पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तेलंगाणा, उत्तराखंड, तामिळनाडू, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, केरळ, गुजरात, आंध्रप्रदेश ओडिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि झारखंड या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये धान खरेदी सुरळीत सुरू आहे. 19.12.2020 पर्यंत 412.91 लाख मेट्रिक टन इतकी धान खरेदी झाली आहे, ज्यात मागील वर्षीच्या तुलनेत 22.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील एकूण खरेदीपैकी केवळ एकट्या पंजाबने 49 टक्क्यांपेक्षा अधिक खरेदी केली आहे. चालू खरीप विपणन हंगामातील किमान हमी भावावरील 77957.83 कोटी रुपयांचा लाभ सुमारे 48.56 लाख शेतकऱ्यांना आधीच झाला आहे.

19.12.2020 पर्यंत, सरकारने आपल्या नोडल एजन्सी मार्फत मूग, उडीद, भुईमुगाच्या शेंगा आणि सोयाबीनची 195899.38 मेट्रिक टन, 1050.08 कोटी रुपये एमएसपी मूल्याची खरेदी केली असून तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि राजस्थानमधील 108310 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.


पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये किमान आधारभूत किमतीने कापूस खरेदी सुरळीत सुरू आहे. 19.12.2020 पर्यंत 16865.81 कोटी रुपये किमतीच्या 5783122 कापसाच्या गाठी खरेदी झाल्या असून त्याचा लाभ 1124252 शेतकऱ्यांना झाला आहे.

* * *
M.Chopade/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682242)
Visitor Counter : 233