शिक्षण मंत्रालय
पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत एआयसीटीई कडून देखभाल भत्ता म्हणून 20,000 रुपये दिले जाणार
एआयसीटीई चा जम्मू-काश्मीर आणि लद्दाख च्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात, 20,000 रुपयांचा देखभाल भत्ता जाहीर
Posted On:
16 DEC 2020 9:40PM by PIB Mumbai
जम्मू काश्मीर आणि लद्दाखच्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद- एआयसीटीसी ने पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 20,000 रुपयांचा पहिला हप्ता देखभाल भत्ता स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात शिक्षण पूर्ण करता यावे, यादृष्टीने हा भत्ता दिला जाणार आहे.
प्रधानमंत्री विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जम्मू-कश्मीर आणि लद्दाखच्या युवकांना दोन प्रकारे शिष्यवृत्ती दिली जाते.यात शैक्षणिक शुल्क आणि देखभाल भत्ता दिला जातो. एआयसीटीई ने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी सर्व शिक्षण संस्थांना संपूर्ण शैक्षणिक शुल्काची रक्कम शिष्यवृत्ती म्हणून वितरीत केली आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पूर्ण देखभाल भत्ता ही शिष्यवृत्तीच्या स्वरूपात देण्यात आला आहे.
कोविड-19 मुळे देशभरातील शिक्षणसंस्था बंद होत्या आणि ऑनलाईन वर्ग सुरु होते.या काळात विद्यार्थ्यांना वसतीगृहे आणि भोजनाचा खर्च येत नसल्यामुळे पुन्हा शिक्षणसंस्था प्रत्यक्षात सुरु होईपर्यंत,देखभाल भत्ता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने त्यांना देखभाल भत्ता म्हणून 20,000
रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. जुलै ते डिसेंबर या सत्रात शिकणाऱ्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना ही रक्कम दिली जाईल. विद्यार्थी पुन्हा शिक्षणसंस्थांमध्ये येऊ लागल्यावर त्यांना देखभाल भत्याची उर्वरित रक्कम दिली जाईल.
***
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681285)
Visitor Counter : 189