सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
नोव्हेंबर 2020 या महिन्यासाठीचा 2012=100 वर आधारित ग्रामीण, शहरी आणि एकत्रित भागातील ग्राहक मूल्य निर्देशांक
Posted On:
14 DEC 2020 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2020
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, या प्रसिद्धीपत्रकाद्वारे, नोव्हेंबर 2020 या महिन्यासाठीचा 2012=100 या पायावर आधारित सीपीआय अर्थात अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक आणि त्याच्याशी संबंधित ग्रामीण, शहरी आणि सीएफपीआय अर्थात एकत्रित ग्राहक अन्न मूल्य निर्देशांक जाहीर करत आहे. अखिल भारतीय आणि सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश अशा दोन्हींच्या गट आणि उप-गटांसाठीचे सीपीआय देखील जाहीर करण्यात आले आहेत.
आठवड्याच्या ठराविक चक्राद्वारे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या क्षेत्रीय कार्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक भेटींच्या माध्यमातून शहरी भागातील निवडक आणि प्रातिनिधिक 1114 बाजारांमधून आणि सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील 1181 गावांमधून किमतींविषयीची माहिती गोळा केली. नोव्हेंबर 2020 या महिन्यात एनएसओने 98.8% ग्रामीण बाजारांतून आणि 98.6% शहरी बाजारांतून अन्नधान्याच्या किमतींची आकडेवारी गोळा केली. तिथे बाजारानुसारच्या किंमती विचारात घेता ग्रामीण भागासाठी त्या 87.0% तर शहरी भागासाठी 91.1% होत्या.
सर्वसामान्य आणि सीएफपीआय निर्देशांकावर आधारित अखिल भारतीय महागाई दर, सर्वसामान्य निर्देशांक आणि सीएफपीआय मधील मासिक पातळीवरचे बदल, सीपीआयच्या मूल्यांची आकडेवारी यांचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680590)
Visitor Counter : 106